बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम गँगस्टर ड्रामा मुंबई सागा चित्रपटात दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. त्याच्यासाठी अॅक्शन सीन करणं एक आयटम साँग करण्यासारखे आहे. त्याने सांगितले की, त्याला मास ओरिएंटेड चित्रपटात काम करायला आवडते कारण जास्त प्रेक्षकांमुळे त्याच्या करिअरच्या कारकीर्दीत इथेपर्यंत पोहचला आहे. काही अभिनेत्यांना डान्स करायला आवडते. माझ्यासाठी अॅक्शन माझा डान्स आहे. हे आयटम साँगसारखे आहे.नुकतेच जॉन अब्राहमने गार्नियरकडून परिवर्तनीय ग्रीन ब्युटी उपक्रम सादरीकरणावेळी हजेरी लावली होती. जॉन गार्नियर इंडियाचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. यावेळी तो बोलत होता.
या उपक्रमाच्या सादरीकरणावेळी जॉन अब्राहम म्हणाला, ''मी दीर्घकाळापासून गार्नियर इंडियाशी सहयोगी राहिलेलो आहे. मला या उपक्रमाचे प्रतिनिधित्व करण्याचा अभिमान वाटत आहे. वर्षानुवर्षे आमच्या पर्यावरणीय संसाधनांचे परिणाम सातत्याने कमी करण्यासह आमचा दृढ विश्वास आहे की मोठ्या संघटित प्रयत्नांसाठी वैयक्तिक योगदानांमुळे ध्येये संपादित करण्यामध्ये मदत होईल.''