Join us

जॉनच्या "परमाणू"चा फर्स्ट लूक रिलीज

By admin | Published: June 22, 2017 1:44 PM

अॅक्शन हिरो जॉन अब्राहमच्या "परमाणू" या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 2- अॅक्शन हिरो जॉन अब्राहमच्या "परमाणू" या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.  जॉनने त्याच्या आगामी ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. अभिषेक शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 1998 साली पोखरणमध्ये झालेल्या आण्विक चाचणीवर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. या सिनेमात अभिनेता जॉन एका जवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीसुद्धा जॉनने पोलीस अधिकारी आणि जवानाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता पुन्हा एकदा तो एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.  
 
जॉन अब्राहमने ‘परमाणू’ सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला असून सर्वात मोठ्या आण्विक चाचणीवर आधारित सिनेमाचा फर्स्ट लूक शेअर करताना मला खूप आनंद होतो आहे, असं कॅप्शन दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच जॉनने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. पहिल्याच दिवशी सेटवर गेल्यानंतरही त्याने पहिला दिवस….. परमाणू …. द स्टोरी ऑफ पोखरण. आतापर्यंत आपण केलेली सर्वात मोठी चाचणी, असं ट्विट केलं होतं.
 
दरम्यान, ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ या सिनेमाचं शूटिंग पूर्णपणे पोखरण इथे होणार नसून ते जैसलमेर, राजस्थान या भागात होणार आहे. तर सिनेमाचा काही भाग पोखरणमध्ये चित्रीत होईल. पोखरण किल्ला, आरटीडीसी, अदा बाजार, गांधी चौक मुख्य मार्केट आणि गोमत रेल्वे स्थानक या काही मुख्य ठिकाणी शूटिंग करण्यात येणार आहे.
 
खरंतर अभिषेक शर्मा दिग्दर्शित या सिनेमाचं राजस्थानमधील पोखरणमध्ये शूटिंग सुरू होणार होतं. शूटिंगची संपूर्ण तयारी झाली होती. गेल्या आठवड्यात सिनेमाचं शूट सुरू असताना एका सीनच्या दरम्यान तेथे किरकोळ दगडफेकीची घटना घडली. रात्रीच्या अंधारात शूटिंग सुरू असल्याने हा प्रकार नेमका कोणी केला हे समजलं नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जॉनने तेथे शूट न करण्याता निर्णय घेतला होता. एक आठवडा तिथे शूट होणार होतं. पण दगडफेकीच्या घटनेनंतर शूटिंग थांबविण्यात आलं होतं. 
 
क्रिअर्ज एण्टरटेन्मेन्ट आणि जेए एण्टरटेन्मेन्ट ‘परमाणू- द स्टोरी ऑफ पोखरण’ सिनेमाची निर्मिती करत आहेत. जॉन व्यतिरीक्त यात डायना पेन्टी आणि बोमन इराणी यांच्यादेखील मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी ८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.