Bigg Boss OTT 3 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. Bigg Boss OTT 3 मध्ये यंदा स्पर्धकांची विविध व्यक्तिमत्व आणि त्यांची घरातील भांडणं चांगलीच गाजतात. Bigg Boss OTT 3 मध्ये काल रविवारी आणखी एका स्पर्धकाला घरातून बाहेर जावं लागलंय. हा स्पर्धक म्हणजे दीपक चौरसिया. दीपक घराबाहेर गेल्यामुळे रणवीर शौरीने त्यांची माफी मागितली. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.
दीपक चौरसिया घराबाहेर, रणवीरने का मागितली माफी
Bigg Boss OTT 3 मधून पत्रकार आणि अँकर दीपक चौरसिया यांना घराबाहेर जावं लागलं. दीपक घराबाहेर जाताच घरातील सदस्यांना चांगलंच दुःख झालेलं दिसलं. रणवीर शौरीने दीपक यांची माफी मागितली. कारण दीपक यांना रणवीरने नॉमिनेट केलं होतं. दीपक यांच्या नावाची घोषणा होताच शिवानी कुमारी आणि साई केतन राव ढसाढसा रडले. दीपक यांचं अनेक सदस्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे दीपक घराबाहेर गेल्याने सर्वांना वाईट वाटलेलं दिसलं.
कोण आहेत दीपक चौरसिया?
दीपक चौरासिया याआधी अनेक कारणांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी दारूच्या नशेत एका डिबेट शोमध्ये अँकरिंग केली होती. चुकीचं वाचल्यामुळे लगेचच त्यांचा शो ऑफ एअर करण्यात आला. त्यानंतर त्यांना नोकरीवरुनही काढण्यात आलं होतं. २००३ मध्ये त्यांनी डीडी न्यूजमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक वृत्त वाहिन्यांमध्ये काम केलं. पण, कॉन्ट्रोवर्सीमुळे ते जास्त चर्चेत होते.