Join us

Jr NTR: RRRच्या अफाट यशानंतर Jr NTRने घेतली 'हनुमान दीक्षा', 21 दिवस अनवाणी पायाने राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 9:04 AM

Jr NTR Hanuman Deeksha: सुपरस्टार जूनियर एनटीआरने हनुमान दीक्षा घेतली असून, त्याचा भगव्या कपड्यातील एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Jr NTR Took Hanuman Deeksha: सध्या संपूर्ण भारतावर दाक्षिणात्य चित्रपटांचाच बोलबाला दिसत आहे. पुष्पा, आरआरआर (RRR) आणि आता आलेल्या केजीएफ चित्रपटांनी छप्पडफाड कमाई केली. 'RRR' चित्रपटाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. जगभरात या चित्रपटाने 1 हजार कोटींपेक्षा जास्तीचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता ज्युनियर एनटीआर(Jr NTR)ने एक मोठा निर्णय घेतला आहे.

भगव्या कपड्यात दिसला एनटीआर नुकताच ज्युनियर एनटीआर भगव्या कपड्यात दिसला होता. भगव्या रंगाचा कुर्ता-पायजामा, गळ्यात माळ आणि कपाळावर तिळा लावलेला त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या या नवीन लुकची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. पण, आता समोर आलेल्या माहितीनुसार, एनटीआरने हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान दीक्षा घेतली आहे. यामुळे आता तो 21 दिवस अनवाणी पायाने राहणार आहे. 

21 दिवस अनवाणी राहणारहनुमान जयंतीच्या दिवशी ज्युनियर एनटीआर मंदिरात पूजा करताना आणि अधिक दीक्षा घेताना दिसला होता. समोर आलेल्या माहितीनुसार एनटीआर हनुमान जयंतीपासून पुढील 21 दिवस अनवाणी राहून सात्विक आहार घेणार आहे. विशेष म्हणजे, ज्युनियर एनटीआर हा अतिशय धार्मिक व्यक्ती आहे. तो अनेकदा मंदिरांमध्ये प्रार्थना करताना दिसून येतो.

राम चरणनेही घेतली दीक्षाअभिनेता राम चरण(Ram Charan) यानेही काही दिवसांपूर्वी अयप्पाची दीक्षा घेतली आहे. राम चरण सध्या अयप्पांच्या दीक्षेचे पालन करत आहे. ज्यामध्ये भगवान अयप्पाचे भक्त केरळमधील शबरीमाला मंदिरात जाण्यापूर्वी 41 दिवसांचा उपवास करतात. या दीक्षेत भक्तांना 41 दिवसांपर्यंत व्रत, काळे कपडे घालणे, ब्रह्मचर्य जीवनाचे पालन, अनवाणी पायाने चालणे, जमिनीवर झोपणे, रोज संध्याकाळी पूजा आणि गळ्यात तुळशीमाल घालण्याचे विधी करावे लागतात.  

टॅग्स :ज्युनिअर एनटीआरराम चरण तेजाआरआरआर सिनेमाहनुमान जयंती