न्यू नॉर्मलमध्ये पुन्हा विमानतळावर पोहचली जूही चावला, तेथील गंभीर परिस्थिती व्हिडीओच्या माध्यमातून आणली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 06:06 PM2020-11-11T18:06:44+5:302020-11-11T18:07:08+5:30

लंडनमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून तिने परतण्याचा निर्णय घेतला. २० मार्चला जुही मुंबईत परतली, नियमानुसार संपूर्ण कुटुंबाने सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते.

Juhi Chawala Video Request To Deploy More Officials And Counters At The Airport | न्यू नॉर्मलमध्ये पुन्हा विमानतळावर पोहचली जूही चावला, तेथील गंभीर परिस्थिती व्हिडीओच्या माध्यमातून आणली समोर

न्यू नॉर्मलमध्ये पुन्हा विमानतळावर पोहचली जूही चावला, तेथील गंभीर परिस्थिती व्हिडीओच्या माध्यमातून आणली समोर

googlenewsNext

अभिनेत्री जूही चावलाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती विमानतळावर दिसत असून  विमानतळावर किती गर्दी आहे आणि विमानतळाची व्यवस्था कशी आहे याविषयी व्हिडिओमध्ये जूही स्थिती दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने विमानतळावर तातडीने जादा काउंटर बसविण्याच्या विनंती केली आहे. जेणेकरुन लोकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि सोशल डिस्टंसही पाळू शकतील.

सर्व प्रवासी विमानातून खाली उतरल्यानंतर काही तास मोठ्या संख्येने एकाच जागी अडकून राहतात. ही सगळी परिस्थिती भयावह असून खरोखर लाजीरवाने आहे. गांभिर्य ठेवणे गरजेचे आहे. आता तर फेस्टीव्हल सिझन सुरू झाले आहेत. विमानतळ, रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होणार अशा वेळी मास्क वापरणेही बंधनकारक असणे गरजेचे आहे. 

यापूर्वी, तिने घरी भाजीपाला पोहचवण्याबद्दलचा एका व्हिडीओससोशल मीडियावर शेअर केला होता. यात तिने म्हटले होते की,या सर्व भाज्या प्लास्टिकमध्ये पॅकमध्ये असल्यामुळे खूप अस्वस्थ झाले आहे. अशा प्रकारे माझ्या घरी काही भाज्या पोचवल्या आहेत. सुशिक्षित लोकांनी पृथ्वीचे सर्वाधिक नुकसान केले आहे. अशावेळी आनंदी रहायचे की रडायचे हे समजत नाही.

LockDown दरम्यान भारतात परतण्यासाठी जुही चावलाला करावा लागला मोठा खटाटोप, अशी परतली तिच्या घरी

कोरोनाव्हायरसमुळे देशात लॉकडाऊन  जाहीर झाले होते.  लॉक डाउन जाहीर होण्याधी सर्व देशातून येणारे जाणारे विमानेउड्डाणं बंद झाल्यानंतरही अभिनेत्री जुही चावला भारतात परतली आणि तिचा जीव भांड्यात पडला. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला हा व्हायरस, संपूर्ण जगात पसरला. इटली, स्पेन या देशांमध्ये तर चीनपेक्षा अधिक बळी गेलेत.भारताने वेळीच सावध होत लॉकडाऊनचं पाऊल उचललं खरं, पण यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर लंडनला गेलेली जुही चावला तिथेच अडकली अकडून  होती. भारतात परतण्यासाठी तिला अखेर भारतीय दुतावासाची मदत घ्यावी लागली. तो अनुभवही तिने चाहत्यांस इंस्टाग्रामवर शेअर केला होता. लंडनमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले होते. कोरोनापासून सुरक्षित राहाता यावे म्हणून तिने परतण्याचा निर्णय घेतला. २० मार्चला जुही मुंबईत परतली, नियमानुसार संपूर्ण कुटुंबाने सेल्फ क्वॉरंटाईन करून घेतले होते.
 

Web Title: Juhi Chawala Video Request To Deploy More Officials And Counters At The Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.