अभिनेत्री जुई गडकरी (Jui gadkari) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जुई सध्या आपल्या 'ठरलं तर मग' या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. जुईचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ती कुणाला डेट करतेय, कधी लग्न करणार, याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. मात्र, जुईनं कधीही ती नक्की कोणाला डेट करतेय याबद्दल खुलासा केलेला नाही. अशातच आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नव्या अपडेट्स समोर आल्या आहेत. अभिनेत्रीने आयुष्याचा जोडीदार कसा हवा हे सांगितलं आहे.
जुई गडकरीनं नुकतंच सुलेखा तळवलकर यांच्या 'दिल के करीब' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी तिनं खाजगी आणि वैयक्तीक आयुष्यावर भाष्य केलं. मुलाखतीमध्ये जुईला कसा नवरा हवा आहे ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जुईनं जोडीदाराकडून तिच्या असलेल्या अपेक्षांबद्दल सांगितलं. जुई म्हणाली, 'अगदी माझ्यासारखाचं... साधा, सरळ, सोपा आणि शाकाहारी असावा. तसेच देवाचं करणारा ही हवा'.
पुढे ती म्हणाली, 'तो फॅमलीवाला पाहिजे. म्हणजे जसं मला कुटुंबात राहायला आवडतं. तसं त्याला पण कुटुंबात राहायला खूप आवडलं पाहिजे. निश्चितच माझ्या क्षेत्राला समजून घेणारा असावा. आमच्या कुटुंबात कसं आहे ना की खूप मनमोकळी माणसं आहेत. ते त्याचा खूप लाड करतील, एवढं मात्र नक्की. तर तसा छान समजून घेणारा आणि मला सांभाळणारा असावा. माझ्या फार काही अपेक्षा नाही आहेत'.
जुई ही सध्या 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. याआधी जुईने 'पुढचं पाऊल' मालिकेत साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना आवडली. आजही या पात्राची प्रेक्षक आठवण काढत असतात.कर्जतच्या या लेकीने कलाविश्वात तिचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.