Join us

'ठरलं तर मग'चं शूट थांबलं? जुई गडकरी म्हणाली, "माझी सर्जरी झाली असली तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 12:34 PM

काही दिवसांपूर्वीच जुईची सर्जरी झाली

मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) सध्या 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ही मालिका बरेच आठवडे टीआरपी चार्टमध्ये नंबर १ वर आहे. सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांच्या आवडीची आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जुईची सर्जरी झाली. नक्की तिला काय झालं होतं हे तिने अजून स्पष्ट केलेलं नाही. मात्र यामुळे मालिकेचं शूट थांबलं अशा चर्चा सुरु झाल्या. आता यावर जुईने उत्तर दिलं आहे.

जुई गडकरी 'ठरलं तर मग' मालिकेत सायली ही मुख्य भूमिका साकारत आहे. सर्जरीनंतर नुकतीच ती पुन्हा सेटवर परतली आहे. मालिकेचं शूट थांबल्याच्या चर्चांवर जुई म्हणाली, " शूटिंग थांबलंय वगरे अशा फेक न्यूजवर विश्वास ठेवू नका. माझी नुकतीच सर्जरी झाली आणि त्याविषयी मी लवकरच पोस्ट करुन सांगेन. तोपर्यंत पेशन्स ठेवा आणि ठरलं तर मग मालिकेवर प्रेम करत राहा."

जुई गडकरीने सेटवर येताच व्हिडिओ शेअर केले आहेत. जेव्हा भावूक सीन्सवेळी मालिकेचं टायटल साँग जोरात लागतं तेव्हाचा व्हिडिओ तिने पोस्ट केला आहे. जुईला नक्की काय झालं होतं याची चाहत्यांमध्ये चिंता आहे तिला सतत त्यावरुन प्रश्न विचारण्यात येत आहेत. यावर जुई लवकरच स्पष्टीकरण देईल असं म्हणाली आहे. 

'ठरलं तर मग' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. सायली अर्जुनच्या संसारात प्रिया विष ओतण्याचं काम करत आहे. तर दुसरीकडे महिमत प्रतिमाच्या जीवावर उठला आहे.

टॅग्स :जुई गडकरीमराठी अभिनेताटेलिव्हिजनटिव्ही कलाकार