Join us

Video : ना जान्हवी ना आलिया तर 'या' स्टारकीडला जस्टिन बीबरने घट्ट मिठी मारली, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 13:55 IST

सध्या अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Anant Ambani-Radhika Merchant Sangeet :  मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीशी राधिका १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. मोठ्या थाटामाटात अनंत-राधिका लग्नसोहळा मुंबईत पार पडणार आहे.  सध्या लग्नाआधीचे कार्यक्रम जोरदार सुरू आहेत. ५ जुलैला संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या संगीत सोहळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार जस्टिन बीबरने परफॉर्म केलं. सर्व पाहुण्यांना जस्टिने आपल्या तालावर थिरकवलं. सध्या अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच एक व्हिडीओ समोर आला आहे.

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीला चक्क परफॉर्मन्स सुरूअसताना जस्टिनने तिचा हात धरुन स्टेजवर घेतलं आणि तिला मिठी मारली. ही तरुणी प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन जावेद जाफरी यांची मुलगी अलविया जाफरी आहे. जस्टिनला मिठी मारल्यानंतर अलविया लाजून लाल झाल्याचं पाहायला मिळालं. अलवियाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.  हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जावेद जाफरीची मुलगी अलाविया जाफरी नेहमी आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते. अलावियाविषयी क्वचितच लोकांना माहित आहे. अलावियाने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नसला तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोईंग चांगली आहे. अलाविया ही एक सोशल मीडिया सेंसेशन आहे.  अलावियानं तिचं शिक्षण धीरूभाई अंबानी स्कूलमधून पूर्ण केलं आहे आणि सध्या ती न्यूयॉर्कमध्ये फॅशन डिझायनिंग शिकत आहेत. अलावियाचा भाऊ मिझान जाफरीने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले असून आता चाहते अलावियाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :जावेद जाफरीजस्टिन बीबरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमासोशल मीडिया