Join us

27 वर्ष बॉलिवूडपासून का लांब होती ज्योतिका? अभिनेत्रीने म्हणाली, 'मला हिंदी सिनेमाच्या ऑफर्स...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 11:20 AM

jyotika: ज्योतिकाने अक्षय खन्नाच्या 'डोली सजा के रखना' या बॉलिवूड सिनेमातून तिची अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

ज्योतिका (jyotika) हे नाव साऊथ इंडस्ट्रीत चांगलंच लोकप्रिय आहे. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या ज्योतिकाने काही बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं आहे. मात्र, त्यानंतर तिचा या इंडस्ट्रीतला वावर कमी झाला. परंतु, तब्बल २७ वर्ष शैतानच्या निमित्ताने तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं. याविषयी एका मुलाखतीमध्ये तिने भाष्य केलं. २७ वर्ष ती बी टाऊनपासून दूर का होती यामागचं कारण तिने सांगितलं.

ज्योतिकाने अक्षय खन्नाच्या 'डोली सजा के रखना' या सिनेमातून तिची अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल गेला. मात्र, ज्योतिकाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. या सिनेमानंतर तिने टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. परंतु, टॉलिवूडमध्ये गेल्यानंतर तिने फार मोजक्या बॉलिवूड सिनेमात काम केलं. त्यामुळे बॉलिवूडपासून तिने दुरावा का घेतला हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर तिने 'न्यूज 18 शोशा' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलं आहे.

"मला एकदाही हिंदी सिनेमाची ऑफर मिळाली नाही. मी २७ वर्षांपूर्वी साऊथ सिनेमांमध्ये एन्ट्री केली आणि तेव्हापासून साऊथ सिनेमांमध्येच काम करतीये. माझा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. हा सगळ्यात मोठा फॉर्मूला बेस्ड आहे. कारण, तुमच्या पहिल्या सिनेमावर तुम्हाला इतर सिनेमाच्या ऑफर्स मिळत असतात", असं ज्योतिका म्हणाली.

पुढे ती म्हणते, "ज्यावेळी मी इंडस्ट्रीत एन्ट्री केली त्यावेळी मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम करणाऱ्या मुलींची संख्या खूप होती. मी जो सिनेमा केला त्याची निर्मितीसोबतही एका मोठ्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत झाली होती. पण, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यानंतर मी साऊथमध्ये आले. इथे आल्यानंतर जो सिनेमा केला तोही अपयशी ठरला. मात्र, माझ्या अभिनयाचं सर्व स्तरामधून कौतुक झालं आणि त्यामुळे मला अन्य साऊथ सिनेमाच्या ऑफर्स मिळाल्या."

हिंदी सिनेमा करण्यात रस नाही

"चेन्नईला गेल्यानंतर सूर्यासोबत माझं लग्न झालं त्यामुळे मला बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करण्यात इंटरेस्ट नाही असा अनेकांचा समज झाला. त्यामुळे असं नाही की मला हिंदी सिनेमांमध्ये काम करायचं नव्हतं. पण, या काही वर्षांमध्ये मला एकाही हिंदी सिनेमाची ऑफर मिळाली नाही." दरम्यान, शैतान या सिनेमानंतर ज्योतिका श्रीकांत या बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा