Join us

कभी अलविदा ना कहना.......बॉलिवूडमधील अभिषेकची १६ वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 7:15 AM

रेफ्युजी चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्युनियर बच्चनच्या कारकिर्दीला आज १६ वर्ष पुर्ण झाली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३० : रेफ्युजी चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्युनियर बच्चनच्या कारकिर्दीला आज १६ वर्ष पुर्ण झाली. कमकुवत अभिनयामुळे आणि अमिताभ ऐश्वर्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या अभिषेकने कालांतराने दर्जेदार अभिनय करत टीकाकारांना प्रतीउत्तर दिले. 
 
५ फेब्रुवारी १९७६ मध्ये मुंबईत जन्माला आलेला अभिषेक बच्चन  हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता व निर्माता आहे. बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन व जया बच्चन ह्यांचा मुलगा असलेल्या अभिषेकने ३० जून २००० सालच्या रेफ्युजी ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. 
 
तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला ३ फिल्मफेअर पुरस्कार, १ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. माजी मिस वर्ल्ड विजेती व बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय ही अभिषेक बच्चनची पत्नी आहे. त्यांच्या जोडीला सिने-जगतात अभिवर्या ह्या टोपणनावाने ओळखले जाते.  
 
 
२० एप्रिल २००७ साली लग्नाच्या बंधनात अडकलेल्या अभिषेक- ऐश्वर्या राय ला २०११ मध्ये कन्यारत्न झाले. तीचं नाव आराध्या असं ठेवण्यात आले. आरध्या लहानपणापासूनच माध्यमांचा केंद्रबिंदू ठरत आहे. 
करिश्मा कपूर - अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनचे ऐश्वर्याआधी पहिले प्रेम करिश्मा कपूर होती. त्यांची लव्हस्टोरी बॉलीवूडमध्ये सर्वश्रृत आहे. इतकंच नव्हे तर या दोघांचा साखरपुडाही झाल्याचेही बोलले जाते. करिश्मा आणि अभिषेक लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. मात्र अभिषेकची बहीण श्वेता हिच्या लग्नानंतर अभिषेक आणि करिश्मा यांच्यातील प्रेम फुलले. श्वेताच्या लग्नादरम्यान करिश्मा आणि अभिषेक जवळ आले. 
 
मात्र दोघांनी खुलेपणाने आपल्या नात्याबद्दल कधी खुलासा केला नाही. त्याचवेळेस अभिषेकला पहिला चित्रपट रेफ्यूजीमधून ब्रेक मिळाला. या चित्रपटात अभिषेकसोबत करीना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. असंही म्हटलं जात की यावेळी करीना सेटवर अभिषेकला जिजू अशी हाक मारायची. करिश्मा अनेकदा चित्रपटाच्या सेटवर येत असे. अभिषेकचा हा चित्रपट मात्र फ्लॉप झाला. अमिताभने ६०व्या वाढदिवशी या दोघांच्या साखरपुड्याची घोषणा केली. 
 
मात्र करिश्माची आई बबिताला अभिषेक आवडत नव्हता. मात्र त्यानंतरी करिश्माने साखरपुडा केला. या दरम्यान, अभिषेकचे अनेक चित्रपट फ्लॉप झाले तर दुसरीकडे करिश्मा सुपरहिट हिरोईन होती. यामुळे करिश्माच्या आईला ही भीती होती की जर अभिषेक यशस्वी झाला नाही तर? अखेर आईच्या दबावापुढे करिश्मा झुकली आणि तिने साखरपुडा मोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर करिश्माने दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केले आणि करिश्मा-अभिषेक यांची प्रेमकहाणी संपुष्टात आली. 
 
कारकिर्दीवर एक नजर
 
२००० रेफ्युजी
२०००ढाई अक्षर प्रेम के
२०००तेरा जादू चल गया
२००१बस इतना सा ख्वाब है
२००२हां मैने भी प्यार किया
२००२शरारत
२००२ओम जय जगदीश
२००२देश- बंगाली चित्रपट
२००३मुंबई से आया मेरा दोस्त
२००३मैं प्रेम की दिवानी हूं
२००३कुछ ना कहो
२००३जमीन
२००३एल.ओ.सी. कारगिल
२००४रन
२००४युवा
२००४धूम
२००४फिर मिलेंगे
२००४नाच
२००५बंटी और बबली
२००५सरकार
२००५दस
२००५ अंतर लहल
२००५ब्लफमास्टर
२००६कभी अलविदा ना कहना
२००६उमराव जान
२००६धूम २
२००७गुरू
२००७झूम बराबर झूम
२००७सरकार राज
२००८द्रोणा
२००८दोस्ताना
२००९दिल्ली 6
२००९पा
२०१०रावण
२०१०खेलें हम जी जान से
२०११गेम
२०११दम मारो दम
२०१२प्लेयर्स
२०१२बोल बच्चन
२०१३धूम ३
२०१४ हॅपी न्यू इयर
२०१५ ऑल इज वेल
२०१६ हाऊसफुल ३