छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात. त्यापैकीच ही एक मालिका आहे. आता या शोमध्ये असे काही घडणार आहे की ज्यामुळे रसिकांना धक्काच बसेल.
मुस्कान मालिका दिवसेंदिवस होणा-या रंजक वळणामुळे अल्पावधीतच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. मालिकेतील कथानकाप्रमाणेच कलाकरांच्या भूमिका रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहेत. त्यानुसार मुस्कानमध्ये अनेक नवीन व्यक्तिरेखा पाहायला मिळत आहे. ह्या शोमध्ये येशा रूघानी आणि शरद मल्होत्रा हे अनुक्रमे मुस्कान आणि रोनकच्या भूमिकांमध्ये आहेत. आता ह्यात अभिनेत्री मून बॅनर्जीची भर पडणार आहे. या आधी मुन 'कुछ रंग प्यार के ऐसी भी' मालिकेतही आईच्या भूमिकेत झळकली होती.
आपल्या वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखेसाठी मानल्या जाणाऱ्या मून ह्या शोमध्ये रोनकच्या आईच्या रूपात दिसून येतील. रोनक ह्या मालिकेतील नायक असून मुस्कान ही ह्या शोमधील नायिका आहे. ह्या शोमधील त्यांची व्यक्तिरेखा ही कभी खुशी कभी गममधील जया बच्चन यांच्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे.
याबद्दल मूनने सांगितले की, “आत्तापर्यंत मी अनेकदा नायिकांच्या आईची भूमिका साकारली आहे, पण प्रथमच मी नायकाची आई साकारणार आहे. खऱ्या आयुष्यात मलाही मुलगा आहे त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला अशी काही विशेष तयारी करावी लागली नाही.तसेच मुस्कानमध्ये काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”
तसेच मालिकेत आणखीन एक अभिनेत्री आहे जी तिच्या भूमिकेसाठी विशेष तयारी करते. मालिकेत आपण कसे दिसतो, याबद्दल काही कलाकार फार दक्ष आणि चोखंदळ असतात. ‘मुस्कान’ मालिकेत मुस्कानचीच भूमिका साकारणारी ऑनस्क्रीन साधी सरळ दिसणारी अभिनेत्री येशा रुघानी ही अशा चोखंदळ कलाकारांपैकी एक आहे. मालिकेत ती मुस्कानच्या आणि डान्स बारमधील नर्तिकेच्या अशा दोन रुपांत दिसते.
मुळात येशा ही गुजराती भाषिक असून येशाला वेस्टर्न ड्रेस परिधान करणे जास्त आवडत नाही. वेशभुषा बाबात ती नेहमीच सजग असून त्यात ती बारकाईने लक्ष देते. त्यामुळे ती तिच्या वेशभूषाकारांना सतत सूचना देत असते आणि आपल्या कपड्यांमध्ये सतत बदल करत असते. तिच्या या सवयीमुळे तिने कपड्यांची चाचणी केल्यावर आता तिचे सर्व कपडे कुलुपबंद करून ठेवले जातात.