सध्या मनोरंजनसृष्टीतून दर चार दिवसाला घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. अनेक सेलिब्रिटी कपल वेगळे होत आहेत. आता 'कैसी ये यारियाँ' फेम अभिनेत्री नीति टेलरही (Niti Taylor) घटस्फोट घेत असल्याची चर्चा सुरु आहे. 2020 साली नीतिने परीक्षित बावाशी लग्नगाठ बांधली होती. आता चार वर्षांनंतर त्यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. नीतिने सोशल मीडियावर पतीचं आडनाव हटवल्याने या चर्चा सुरु झाल्या आहेत.
Reddit वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात म्हटलं आहे की, "मला खरंच आहे वाटतंय की हे दोघं वेगळे झाले आहेत. कारण नीतिने अचानक पतीला अनफॉलो केलं आणि नंतर परीक्षितने स्वत:चं अकाऊंटच डिलिट केलं. इतकंच नाही तर तिने सासरच्यांसोबतचे तिचे व्हिडिओही युट्यूबवरुन काढले आहेत. सगळे नाही पण काही काढलेत. तिने होळीचे फोटोही हटवले. मला वाटतं तिने काही पोस्ट नक्कीच डिलिट केल्या आहेत आणि कोणाला शंका येऊ नये म्हणून कदाचित तिने सर्व पोस्ट अद्याप काढल्या नाहीत."
नीति टेलरने 'बडे अच्छे लगते है 2', 'कैसी ये यारियाँ 2','इश्कबाज' या मालिकांमध्येही काम केलं.