Join us

काजोल अग्रवालचे या कारणामुळे होतंय कौतुक, फॅनला केली चक्क इतक्या रुपयांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:26 IST

एका चाहतीने काजलकडे कॉलेजची फी भरण्यासाठी मदत मागितली होती आणि तिने देखील कोणताही विचार न करता या चाहतीला मदत केली.

ठळक मुद्देसुमाने काजलला टॅग करत एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने लिहिले होते की, माझी काही दिवसांपूर्वी नोकरी गेली असून फार्मा करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला ही फी भरण्यास कृपया मदत करा...

आपल्या फॅन्ससाठी काहीही करायला कलाकार तयार असतात. कारण आपण काहीही आहोत हे आपल्या फॅन्समुळे असे कलाकारांचे म्हणणे असते. आता तर काजल अग्रवालने आपल्या एका फॅनला पैशांची गरज असल्याने त्या फॅनला मदत केली आहे.

सिंघम फेम काजल अग्रवालने हिंदी प्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटातील तिच्या कामाचे तर तिचे चांगलेच कौतुक होते. तिच्या दक्षिणेतील एका चाहतीने तिच्याकडे कॉलेजची फी भरण्यासाठी मदत मागितली होती आणि तिने देखील कोणताही विचार न करता या चाहतीला मदत केली.

काजलची फॅन सुमा ही फॉर्मासिस्टची विद्यार्थीनी असून तिच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने ट्विटरच्या माध्यमातून काजलकडे पैसे मागितले होते. तिने काजलला टॅग करत तिचे अकाऊंट डिटेल शेअर केले होते आणि फी भरण्यासाठी मदत करण्याबाबत सांगितले होते. काजोलने हे ट्वीट वाचल्यानंतर लगेचच तिच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले.

सुमाने काजलला टॅग करत एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने लिहिले होते की, माझी काही दिवसांपूर्वी नोकरी गेली असून फार्मा करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला ही फी भरण्यास कृपया मदत करा...

काजोलने लगेचच एक लाख रुपये या मुलीच्या खात्यात जमा केले. त्यामुळे तिने सोशल मीडियाद्वारे तिचे आभार मानले. काजोल अतिशय दानशूर असल्याचे तिचे फॅन्स म्हणत असून सोशल मीडियाद्वारे तिचे कौतुक करत आहेत. 

टॅग्स :काजल अग्रवाल