Join us

लग्नाच्या एकदिवस आधी अशी रंगली काजल अग्रवालच्या हातावर गौतम किचलूच्या नावाची मेंहदी, पाहा फोटो

By गीतांजली | Updated: October 30, 2020 11:37 IST

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरु आहे

बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. उद्या 30 ऑक्टोबर काजल बिजनेसमन गौतम किचलूसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. लग्नाच्या एका दिवस आधी काजलच्या मेंहदीचे फोटो समोर आले आहेत, जे काजलने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. काजलच्या मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. 

या फोटोत काजलच्या दोनही हातावर मेंहदी लागलेली आहे. ती खूप खुश दिसते आहे. फोटोमध्ये काजलने ग्रीन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

काजलने लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर कन्फर्म केली होती. ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे,’असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता.काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून.साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.

टॅग्स :काजल अग्रवाल