Join us

काजलच्या संमतीविना किसिंग सीन

By admin | Published: May 10, 2016 6:25 PM

'सिंघम' फेम काजल अग्रवालने आतापर्यंत कधीही ऑनस्क्रीन किसींग सीन दिलेला नाही. पण दीपक तिजोरीच्या 'दो लफजो की कहानी'च्या चित्रीकरणाच्यावेळी तिने हा नियम मोडला.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १० - 'सिंघम' फेम काजल अग्रवालने आतापर्यंत कधीही ऑनस्क्रीन किसींग सीन दिलेला नाही. पण दीपक तिजोरीच्या 'दो लफजो की कहानी'च्या चित्रीकरणाच्यावेळी तिने हा नियम मोडला. दक्षिणेतील सुपरस्टार असलेल्या काजलने आपल्या प्रतिमेला धक्का लागू नये यासाठी किसींग सीन दिला नव्हता. मात्र मलेशियामध्ये 'दो लफजो की कहानी'च्या चित्रीकरणाच्यावेळी अत्यंत धक्कादायक पद्धतीने हा किसींग सीन चित्रीत झाला. 
 
रणदीप हूड्डा आणि काजलमध्ये रोमँटीक दृश्य चित्रीत होत असताना रणदीपने काजोलला कुठलीही कल्पना न देता झटकन किस केले. या दृश्यानंतर काजल अवाक होऊन पाहतच राहिली. क्षणभरासाठी तिलाही धक्का बसला. रणदीपच्या या कृत्यानंतर ती अपसेट झाली. ती रणदीपला काही बोलली नाही. पण तिथून थेट आत रुममध्ये निघून गेली. 
 
तिने नंतर दीपक तिजोरीकडे तो सीन काढून टाकण्याची मागणी केली. मी किसींग सीन करत नाही. या दृश्यामुळे दक्षिणेतील आपल्या करीयरवर परिणाम होऊ शकतो असे काजलने आपल्याला सांगितले. पण तिची प्रतिमा खराब करण्याचा किंवा कल्पना न देता किसींग सीन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. दोन प्रेमीयुगलांमधले ते एक भावनात्मक दृश्य होते असे दीपक तिजोरीने सांगितले. किसींग सीन ही कथानकाची गरज आहे हे काजलला समजावून सांगितल्यानंतर तिला पटले असे दीपक तिजोरीने सांगितले.