Join us

काजोल-अजय देवगणही म्हणतायेत 'चला हवा येवू द्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 6:25 PM

मराठी भाषा बोलून रसिकांनाहीचेही तुफान मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची एक गोड जोडी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी सज्ज झालीय.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १८ - 'चला हवा येवू द्या' या कार्यक्रमाची भुरळ बॉलिवूड कलाकरांनाही पडतेय हे शाहरूख खान, सलमान खान यांनी लावेल्या उपस्थिती मुळे कळाले होते. अनेक बॉलिवूड कलाकारांनी या कार्यक्रमात हजेरी लावत मराठी भाषा बोलून रसिकांनाहीचेही तुफान मनोरंजन केले. आता पुन्हा एकदा बॉलिवूडची एक गोड जोडी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी सज्ज झालीय. ती जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगण. लवकरच अजय देवगन दिग्दर्शित 'शिवाय' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी सध्या अजय देवगण सिनेमाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतोय. याचनिमित्ताने ही गोड जोडी आता 'चला हवा द्या' च्या मंचावर उपस्थिती लावणार आहेत. विशेष म्हणजे काजोलला मराठी भाषा समजतेही आणि उत्तम बोलताही येते. मात्र अजय देवगणलाला मराठी बोलता येत नसल्यामुळे अजयला काजोलने ''चला हवा येवू द्या'' हे कसे बोलावे शिकवत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

कजोल हे सगळे अजयला शिकवत असतांना अजय ही मजेशीर रित्या ''आता माझी सटकली''. असे डायलॉगबाजी करत मस्तीच्या मुड मध्ये दिसतोय. इतका सराव केल्यानंतर लवकरच काजोल-अजयचा मराठी बाणा छोट्या पडद्यावर रसिकांना अनुभवता येणार हे मात्र नक्की