काजोल आणि अजय देवगणची जोडी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन चाहत्यांची आवडती आहे. दोघेही सुखांने संसार करत आहेत. त्यांच्या लग्नाला आज 22 वर्षे झाली आहेत. काजोल आणि अजय देवगणचं लग्न हे तिच्या वडिलांच्या इच्छेविरूद्ध झाले असा खुलासा तिने केला. यात त्याच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता.
अशी सुरु झाली होती लव्हस्टोरीअजय देवगण व काजोल यांची पहिली भेट १९९५ साली झाली होती. ‘हलचल’च्या सेटवर. अर्थात या पहिल्या भेटीत अजयला काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुस-यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. विश्वास बसणार नाही यानंतर पुढचे दोन वर्षे खरोखर दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. कारण त्यावेळी अजय दुस-या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली.
वयाच्या 24 व्या वर्षी लग्न करण्याची इच्छा नव्हती काजोल आणि अजय देवगणचे वैवाहिक आयुष्य सुरळीत चालले आहे. नीसा आणि युग अशी दोन मुलं आहेत आणि ते दोघेही पालकांची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळत आहेत. लग्नानंतरही काजोल आज चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. काजोल एका न्यूज पोर्टलशी बोलताना तिच्या लग्नाबद्दल एक खुलासा केला. ती म्हणाली, तिचे वडील शोमू मुखर्जी वयाच्या २४ व्या वर्षी लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात होते. लग्नाआधी काजोलने काम करावे अशी त्याची इच्छा होती. मात्र, काजोलच्या या निर्णयाला तिची आई तनुजा यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला.
काजोलची आई तनुजाने तिला पाठिंबा दिला काजोलने सांगितले की, तिच्या आई तनुजा सांगितले आपण आपल्या मनाचे ऐकले पाहिजे. अजय देवगण आणि काजोलचे २४ फेब्रुवारी १९९९ रोजी लग्न झाले.