Join us

एकाला ६ महिन्यात, तर दुसऱ्याला २ वर्षात केलं आयुष्यातून आऊट; तनिषा मुखर्जीचा झालाय २ वेळा ब्रेकअप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:53 AM

Tanisha mukherjee: तनिषा एकेकाळी बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राला डेट करत होती. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले.

बॉलिवूड अभिनेत्री तनुजा यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या दोन्ही लेकींनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात काजोल यशस्वी अभिनेत्री ठरली. तर, तिची धाकटी बहीण तनिषा मात्र तिला हवं तितकं यश मिळालं नाही. अगदी मोजक्या काही सिनेमांमध्ये ती झळकली. परंतु, तनिषा तिच्या फिल्मी करिअरपेक्षा पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अफेअर आणि लग्नाविषयी भाष्य केलं.

तनिषाने अलिकडेच सिद्धार्थ कननच्या पॉडकास्टमध्ये तिच्या करिअरसोबतच पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं. यावेळी तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंड आणि डेटिंगविषयीदेखील खुलासे केले. तनिषा एकेकाळी बॉलिवूड अभिनेता उदय चोप्राला डेट करत होती. मात्र, काही कारणास्तव ते विभक्त झाले. विशेष म्हणजे उदयसोबतच्या अफेअरवर तनिषा पहिल्यांदाच व्यक्त झाली.

"उदय आणि मी आम्ही दोघांनी नील आणि निक्की या सिनेमात एकत्र काम केलं होतं. या सिनेमात आमची काही रोमॅण्टिक दृश्य होती. आम्ही दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होतो आणि या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही रिलेशनमध्ये आलो. तेव्हा असं झालं होतं की, मी माझ्या बॉयफ्रेंडसोबतच काम करतीये त्यामुळे मग सिनेमात काम करणं जास्त सोपं झालं", असं तनिषा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाच्या सेटवर त्याची आणि माझी पहिली भेट झाली. तेव्हा आम्ही फक्त चांगले मित्र होतो. त्यानंतर मग आम्ही २ वर्ष एकत्र होतो. परंतु, मग विभक्त झालो. आजही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. पण, कोणताही ब्रेकअप करणं कठीणच असतं. त्यावेळी ते आमच्यासाठी कठीणच होतं. माझा एक बॉयफ्रेंड होतो जो खूपच जास्त पझेसिव्ह होता. त्यामुळे मी त्याला लगेच सोडलं. अशा नात्यात मी जास्त काळ राहू शकत नाही. मी २ वर्षात लगेच त्याच्यापासून वेगळी झाले. त्यानंतर आणखी एक होता त्याला तर मी ६ महिन्यातच बाय केलं. आपण कोणालाही बदलू शकत नाही. जर  तुम्हाला आधीच माहित असेल की समोरचा व्यक्ती उदास आहे तर तुम्ही त्या नात्यात जाणं टाळायला हवं. मात्र, जर तुम्ही रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती काही कारणामुळे उदास होत असेल तर त्या नात्याला तुम्ही किती टक्के द्यायचे  याचा निर्णय घेणं गरजेचं असतं." 

दरम्यान, या मुलाखतीमध्ये तनिषाने तिचे कुटुंबीय किंवा मित्रपरिवार तिच्या नात्याबद्दल फारसे ओपन नसल्याचंही तिने यावेळी सांगितलं.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीकाजोलउदय चोप्रा