काजोलचा (Kajol ) ‘सलाम वेंकी’ हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काजोलचा ‘सलाम वेंकी’ हा सिनेमा येत्या 9 डिसेंबरला रिलीज होतोय. यात काजोलने आईची भूमिका साकारली आहे. आजारी मुलगा आणि त्याच्या आईची कथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सध्या काजोल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. स्वत:सोबतच पती अजय देवगण आणि लेक न्यासा देवगणच्या (Nysa Devgan )करिअरवर ती भरभरून बोलतेय.
न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत काजोल यावरही बोलली. ‘सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही,’ असं काजोल म्हणाली.
मी ट्रोलर्सला भाव देत नाही...सोशल मीडियावर पसरत चाललेल्या निगेटीव्हीटीवर आत्तापर्यंत अनेक कलाकार बोलले. काजोलचं यावर काय मत आहे? तर काजोल ट्रोलर्सला अजिबात भाव देत नाही. सोशल मीडियावर नकारात्मकता वाढत चालली आहे. यामुळे कधीकधी वाईटही वाटतं. सगळे करतात, मग आपण ट्रोल केलं तर काय, असा विचार लोक करतात आणि मग हे सगळं वाढत जात. माझं म्हणाल तर मी नकारात्मकतेत सकारात्मक पाहणारी महिला आहे. मी ट्रोलर्सला अजिबात भाव देत नाही, असं ती म्हणाली.
माझ्या लाईफमध्ये कोणतीही कॉन्ट्रोव्हर्सी नाही...होय, इतक्या मोठ्या करिअरमध्ये काजोल कुठल्याही कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकलेली नाही. यावर ती बोलली. ती म्हणाली, ‘हां यार, माझ्या लाईफमध्ये कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी नाही. असतीच तर कदाचित आणखी इंटरेस्टिंग असती(हसत हसत). मला जे काही बोलायचं ते मी समोर बोलते. मी माझं मत मांडू शकेल, इतकी हिंमत माझ्यात आहे. त्यासाठी मला सोशल मीडियावर जाण्याची वा मुलाखत देण्याची गरज नाही. मी तोंडावर बोलू शकते आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे.’