सध्या चित्रपटसृष्टीत अभिनेता रणवीर सिंहची भलतीच क्रेझ आहे. त्याने साकारलेला 'सिम्बा' चित्रपटातील संग्राम भालेराव भलताच भाव खावून गेला. सिम्बा चित्रपटात तब्बल अकरा मराठी कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या. सौरभ गोखले, अश्विनी काळसेकर, विजय पाटकर, नेहा महाजन, अशोक समर्थ, वैदेही परशुरामी, अरूण नलावडे, सुलभा आर्या, नंदु माधव, सुचित्रा बांदेकर, आणि सिध्दार्थ जाधव हे अकरा मराठी कलाकारही महत्वाच्या भूमिका होत्या.या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान रणवीर आणि या मराठी कलाकारांचं वेगळं बाँडिंग दिसून आलं.
त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि रसिक यांच्यात रणवीरबद्दलची आपुलकी, प्रेम वाढलं. हिंदी चित्रपटसृष्टीच्या या स्टारसह काम करण्यासाठी हिंदीसह मराठीतील कलाकारही उत्सुक आहेत. इतकंच नाहीतर त्याच्यासह एका फ्रेममध्ये झळकण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. मग तो चित्रपट असो किंवा एखादा फोटो. मराठमोळी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हीसुद्धा रणवीर सिंहची खास फॅन आहे. नुकताच तिने रणवीरसोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. रणवीरसह हा सेल्फी काढून मृण्मयी भलतीच खूश झाली असून तिने या सेल्फीला ‘अपना टाइम आयेगा’ अशी कॅप्शनही दिली आहे.
कल्याणी मुळे ही मुळात नाट्य कलाकार असल्याने अनेक हिंदी मराठी नाटक, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे. कल्याणीने रवी जाधव दिग्दर्शित 'न्युड' सिनेमातही झळकली होती. 'न्यूड' सिनेमात तिने 'यमुना' या मॉडेलची भूमिका साकारली होती. यात न्यूड मॉडलिंग करणाऱ्या महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष चितारण्यात आला होता. या सिनेमातील तिच्या भूमिकेच विशेष कौतुक झाले होते. तसेच नुकतंच 'मी पण सचिन' या चित्रपटात भूमिका साकारली आहे. या चित्रपटात तिच्यासह स्वप्नील जोशी, अभिजीत खांडकेकर आणि प्रियदर्शन जाधव यांनी भूमिका साकारल्या आहेत.