Join us  

10 वर्षात प्रियंका व निकचा घटस्फोट होणार...! केआरके पुन्हा बरळला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 11:19 AM

आपल्या वादग्रस्त ट्वीटमुळे केआरके सतत चर्चेत असतो. त्याचे ट्वीट पब्लिक फार काही गंभीरपणे घेत नाही. पण कधीकधी केआरके असं काही बोलून जातो की, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही.

ठळक मुद्देकेआरकेच्या या दोन्ही पोस्ट पाहून युजर्स भडकले. कधी तर लोकांबद्दल चांगलं बोलत जा, असं एका युजरनं त्याला सुनावलं.

बॉलिवूड पासून हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत सुखानं संसार करतेय. दोघेही एकमेकांसोबत आनंदात आहेत. पण दहा वर्षांनंतर प्रियंका व निकचा घटस्फोट ( Priyanka Chopra Nick Jonas ) होणार आहे, असं कोणी म्हटल्यावर पीसीच्या चाहत्यांना धक्का बसणारच. तर प्रियंका व निकच्या घटस्फोटाची भविष्यवाणी करणारा दुसरा तिसरा कोणी नसून कमाल राशीद खान (Kamaal R Khan)उर्फ केआरके आहे.आपल्या विचित्र व वादग्रस्त ट्वीटमुळे केआरके सतत चर्चेत असतो. त्याचे  ट्वीट पब्लिक फार काही गंभीरपणे घेत नाही. पण कधीकधी केआरके असं काही बोलून जातो की, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. आता केआरकेनं करिना कपूर आणि प्रियंका चोप्राबद्दल ट्वीट केलं आणि लोक त्याच्यावर भडकले. इतकंच नाही लोकांनी त्याला मर्यादा न लांघण्याचा इशाराही दिला.

केआरकेनं  प्रियंकाच्या लग्नाबद्दल भाकीत करणारं ट्वीट केलं. शिवाय करिना कपूरच्या दोन्ही मुलांबद्दलही भविष्यवाणी केली.‘ निक जोनास पुढच्या 10 वर्षात प्रियंका चोप्राला घटस्फोट देणार,’असं एक भाकीत करणारं ट्वीट त्यानं केलं.

दुसरी भविष्यवाणी त्यानं करिना कपूरच्या दोन्ही मुलांबद्दल केली. ‘सैफ व करिनाची दोन्ही मुलं यशस्वी अभिनेते बनू शकणार नाहीत. कारण त्यांची नावं,’असं त्यानं त्याच्या या ट्वीटमध्ये लिहिले.

केआरकेच्या या दोन्ही पोस्ट पाहून युजर्स भडकले. कधी तर लोकांबद्दल चांगलं बोलत जा, असं एका युजरनं त्याला सुनावलं. तुला लोकांच्या पर्सनल लाईफमध्ये नाक खुपसण्याची गरज नाही. मर्यादेत राहायचं तुला शिकवावं लागेल,अशा शब्दांत एका युजरनं त्याचा संताप व्यक्त केला. हे जरा अति झालं, दुस-यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलणं बंद कर, असं एका युजरनं त्याला सुनावलं. एका युजरनं तर केआरकेला चांगलंच फैलावर घेतलं. चेहरा चांगला नाही तर किमान शब्द तर चांगले ठेव. तुला सुद्धा मुलगी आहे. दुस-याबद्दल वाईट विचार करणं सोड, असं या युजरनं लिहिलं.

 

टॅग्स :कमाल आर खानप्रियंका चोप्रानिक जोनास