बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी लवकरच ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मिजानला लॉन्च करणार आहेत. भन्साळींची भाची शर्मिन सेहगल ही सुद्धा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. ‘मलाल’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला ब-यापैकी रिस्पॉन्स दिला. पण बॉलिवूडचा एक ‘खान’ मात्र हा ट्रेलर पाहून नेहमीप्रमाणे बरळला. मिजान व शर्मिन दोघांनाही ‘हॉरीबल, डफर अॅक्टर्स’ ठरवत त्याने असे काही ट्वीट केले की, जावेद जाफरी भडकला.आता बॉलिवूडचा हा ‘खान’ कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर आहे कमाल आर खान अर्थात केआरके. केआरके कायम त्याच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेत असतो. त्याने मिजान आणि शर्मिनबद्दल असेच एक ट्वीट केले.
‘फिल्म मेकर्स नेपोटिज्ममुळे अशा नॉन टॅलेंटेड आणि हॉरिबल दिसणा-या कलाकारांना लॉन्च करणार असतील तर हा गुन्हा आहे. पब्लिक कधीच आपल्या कष्टाची कमाई अशा डफर अॅक्टर्सला पाहण्यासाठी खर्च करणार नाही. त्यामुळे लोक मूर्ख आहेत आणि त्यांना मूर्ख बनवले जाऊ शकते, असे बॉलिवूडला वाटत असेल तर त्यांनी असा विचार करणे बंद करावे,’ असे केआरकेने लिहिले.
तो इथेच थांबला नाही तर त्याने कमाल आर खानसाठी आणखी एक ट्वीट केले. ‘जिथे प्रचंड स्पर्धा आणि पैशांचा प्रश्न आहे, तिथे कुठलाही निर्माता हॉरीबल, डफर कलाकारांवर पैसा लावणार नाही. इंडस्ट्रीत असलेल्या ओळखीच्या भरवशावर केवळ इंटरव्ह्यूपर्यंत पोहचता येऊ शकते. पण नंतर टॅलेंटच कामात येते. शेवटी प्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी त्यांना दिवसरात्र कष्ट करावे लागतात,’ असेही जावेद जाफरीने सुनावले.