काल अभिनेता अर्जुन कपूरचा वाढदिवस साजरा झाला. यानिमित्ताने अनेकांनी अर्जुनवर शुभेच्छांचा वर्षाव केला. अर्जुनची ‘लेडी लव्ह’ मलायका अरोरा हिनेही एक रोमॅन्टिक फोटो शेअर करत, बॉयफ्रेन्डला खास शुभेच्छा दिल्यात. पण मलायकाने शेअर केलेल्या या फोटोवर केआरके अर्थात कमाल आर खानची (Kamaal R Khan) नजर गेली आणि त्याने यानिमित्ताने सलमान खानला (Salman Khan) डिवचण्याची नेमकी संधी साधली. मलायका व अर्जुनचा (Malaika Arora and Arjun Kapoor) रोमॅन्टिक फोटो शेअर करत, त्याने असे काही ट्वीट केले की, ते लगेच व्हायरल झाले.
‘भाई, अर्जुन कपूर टायगर है तू. गुर्दा है तेरे में. डंके की चोट पर छीन लिया. सॅल्यूट आपको,’ असे ट्वीट केआरकेने केले. केआरकेचा इशारा ‘खान’ कुटुंबाकडे होता, हे लपून राहिले नाही. पण यावरून केआरके ट्रोल झाल्यावर त्याने घुमजाव केले.‘अरे तुम्ही लोक नेहमी चुकीचा अर्थ का काढता? मी तर ‘एक विलन’ हा सिनेमा सिद्धार्थ मल्होत्राकडून हिसकावून घेतल्याबद्दल बोलतोय, आणखी काहीही नाही,’ असा खुलासा त्याने केला.
मलायका व अर्जुन कपूर 2019 पासून एकमेकांना डेट करत आहेत. सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका व अर्जुन कपूरचे रिलेशनशिप ख-या अर्थाने जगजाहिर झाले. आताश: दोघेही खुल्लमखुल्ला फिरताना दिसतात. अनेकदा दोघेही एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात.केआरकेने ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमानच्या ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली होती. हा सिनेमा पाहून माझी तब्येत बिघडली, असे त्याने या सिनेमाचा रिव्ह्यू देताना म्हटले होते. राधे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे, असेही तो म्हणाला होता. यानंतर सलमानने केआरकेविरूद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. ‘राधे’चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकल्याचे केआरकेने म्हटले होते. मात्र सलमानच्या वकीलांनीयाबाबत खुलासा करत, मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यूचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.