साऊथ सुपरस्टार कमल हसन(Kamal Hassan) अनेकदा त्यांच्या राजकीय विधानामुळे चर्चेत असतात. एकीकडे देशभरातील लोक राम मंदिर उभारल्याच्या आनंदात आहेत तर दुसरीकडे कमल हसन यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. चेन्नईतील माध्यमांशी बातचीत करताना कमल हसन यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर प्रतिक्रिया दिली. यावर 30 वर्षांपूर्वीच्या विधानावर आपण ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कमल हसन इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, "माझं उत्तर आजही तसंच आहे जे ३० वर्षांपूर्वी होतं. कोणालाही बाबरी मस्जिद पाडण्याचा अधिकार नव्हता. ही माझी इमारत होती जशी तंजौर मंदिर आणि वेलंकन्नी चर्च माझं आहे." या उत्तरासोबत कमल हसन यांनी कोणतंच सरळ वक्तव्य केलं नाही. मात्र त्यांचा इशारा धार्मिक मतभेदांवर विश्वास नाही याकडेच त्यांचा इशारा होता.
1991 साली जेव्हा अयोध्या येथे बाबरी मस्जिदवरुन दंगल झाली होती. तेव्हा कमल हसन म्हणाले होते की, "राम मंदिर असो किंवा बाबरी मस्जिद, यामुळे काहीच फरक पडत नाही. धार्मिक मतभेद पसरवणाऱ्या विचारधारेवर माझा विश्वास नाही." कमल हसन हे त्या व्यक्तींपैकी एक होते ज्यांनी बाबरी पाडल्यानंतर लगेच प्रतिक्रिया दिली होती.
2020 साली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बीजेपी नेता लालकृष्ण अडवाणीसह बाबरी मस्जिद पाडणाऱ्या सर्वांना सोडण्यात आलं. तेव्हा कमल हसन यांच्या ट्वीटने खळबळ उडाली होती. 'न्यायालयासमोर पुरावे आणि सर्व युक्तिवाद सादर करुनही हा निर्णय का? ही सुनियोजित कारवाई होती का? भारतीयांची न्यायाची आशा व्यर्थ गेली नाही पाहिजे. '