Join us

बिकीनी फोटोत महिला दिनाचा संदेश द्यायला गेली आणि 'ही'अभिनेत्री ट्रोल झाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:49 IST

Kamya Punjabi trolled for her International Women's Day post: इतकेच नाही तर विनामेकअपमुळे काम्याला युजर्स सस्ती स्वरा भास्कही म्हणूनही तिच्यावर टीका करत आहेत.

खरंतर अभिनेत्रींना बिकीनीत पाहणे यात काही नवीन नाही.टीव्ही असो बॉलिवूड असो सगळ्याच बिकीन फोटोत फोटो क्लिक करतात. मात्र महिला दिनाचे औचित्य साधून बिकीनी फोटो टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीने शेअर केला आणि तिथेच ती फसली. शेअर केलेल्या फोटोत तिने स्टाँग मेसेजही दिला. मात्र नेटीझन्सने तिला चांगलेच फैलावर घेतले. बिकीनी फोटोवर नारीशक्तीचा संदेश देणे चाहत्यांना काही पटले नाही. 

व्वा काय प्रेरणा आहे, तर काहींनी नारीशक्तीचा संदेश देण्यासाठी बिकीनी फोटोची काय गरज, नेमकं यातून काय प्रेरणा घ्यावी अशा कमेंट करत तिच्यावर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. नेटक-यांनी तिच्या बिकीनी फोटोंवर भन्नाट कमेंट करत जबरदस्त ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर विनामेकअपमुळे काम्याला युजर्स सस्ती स्वरा भास्कही म्हणूनही तिच्यावर टीका करत आहेत.

कोणी काय करावे, काय करु नये हे ज्याचा त्याच प्रश्न आहे. हे जरी खरे असले तरी सेलिब्रेटींचे अनुकरन इतरही करत असतात. त्यामुळे याचे भान सेलिब्रेटींनीही ठेवणे गरजेचे आहे. आपण कोणत्या दिवसाचे कसे सेलिब्रेशन करत आहोत.काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत हेच सेलिब्रेटीमंडळी विसरत चालले आहेत.अशा अनेक संतप्त प्रतिक्रीयाचा सामना सध्या काम्याला करावा लागत आहे. 

पहिल्यांदाच काम्या ट्रोल झाली आहे असे नाही. यापूर्वीही तिच्या लग्नाच्यावेळी ती ट्रोल झाल होती. मात्र शलभ डांगने वेळीच ट्रोलर्सना उत्तर देत बोलती बंद केली होती.  शलभ डांगसह  40 वर्षीय काम्याने दुसरे लग्न केले आहे.

 

यापूर्वी तिचे बंटी नेगी या व्यावसायिकाशी लग्न झाले होते. पण केवळ 10 वर्षे त्यांचे लग्न टिकले. 2013 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बंटीपासून काम्याला एक मुलगी (आरा) आहे, जी आता तिच्याबरोबर राहते.

टॅग्स :काम्या पंजाबीजागतिक महिला दिन