Join us

कंगणाने सँडल फेकून मारत शिवीगाळ केली, बड्या अभिनेत्याच्या लेकाची #MeToo अंतर्गत आपबिती... लोकांनी खिल्ली उडवल्याचंही ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 9:41 PM

मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता.

सोशल मीडियावर सध्या #MeToo या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवसागणिक कोणत्या ना कोणत्या आरोपांनी चित्रपटसृष्टी हादरत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता शेखर सुमन याचा लेक आणि अभिनेता अध्ययन सुमन यानेही एक ट्विट केलं आहे. अनेक दिवसांपासून काही जण आपल्याला काय काय सहन करावं लागले हे सोशल मीडियावर शेअर करायला सांगत होते. मात्र माफ करा, कारण ज्यावेळी 2 वर्षांपूर्वी जेव्हा सगळं सांगितलं त्यावेळी खिल्ली उडवण्यात आल्याचे अध्ययनने ट्विटमध्ये नमूद केले आहे. आपण ज्यावेळी आपली व्यथा सांगितली त्यावेळी माझ्यावर फ्लॉप असल्याचा शिक्का मारून हिणवण्यात आल्याचे त्याने सांगितलं. त्या सगळ्या प्रकारामुळे आई-वडिलांनाही राष्ट्रीय टीव्ही चॅनेल्सवर बरंच ऐकून घ्यावं लागल्याचेही त्याने म्हटलं आहे. मात्र आता #MeToo या मोहिमेमुळे पीडितांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याची संधी मिळत असल्याचेही त्याने सांगितले आहे. कंगणा राणौतने आपला मानसिक आणि शारीरिक छळ केला होता, शिवीगाळ केली होती आणि इतकंच नाही तर सँडल फेकून मारली होती असा आरोप अध्ययनने केला होता.

हा सगळा प्रकार 2016 साली हृतिक रोशनने आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीहून परतताना घडल्याचा आरोप अध्ययने केला होता. त्यावेळी कारमध्ये कंगणाने कारमध्ये असभ्य वर्तन करत मारहाण केल्याचंही अध्ययने म्हटले होते. शिवाय जबरदस्तीने घरी सोडायला सांगितले होते. मध्यरात्री भररस्त्यात कंगणाने धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याची आठवणही अध्ययने त्यावेळी सांगितली होती. याशिवाय कंगणा करियरमध्ये यश मिळावं यासाठी काळी जादू करायची असा आरोपही अध्ययनने केला होता. घरी ती पूजा करायची आणि त्या वस्तू आपल्याला स्मशनात फेकून यायला सांगायची असा दावाही त्याने केला होता. अध्ययने कंगणासह राज-2 या सिनेमात काम केले होते. या दोघांचं अफेअरही होते मात्र लगेचच दोघांचं ब्रेकअपही झालं. 

टॅग्स :मीटूकंगना राणौतशेखर सुमनअध्ययन सुमन