Join us  

क्वीन रिटर्न! कंगना रणौतने पुन्हा दिलजीतवर साधला निशाणा, यावेळी तर प्रियांकालाही लगावला टोला....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 11:27 AM

दिलजीत आणि प्रियांकाला कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केलाय. याआधी शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटवरून कंगना आणि दिलजीतमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं.

कंगना रणौतने पुन्हा एकदा दिलजीत दोसांजवर ट्विटरवरून निशाणा साधण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी तिच्या निशाण्यावर प्रियांका चोप्राही आहे. कंगनी कृषी विधेयकारवरून अनेक ट्विट्स केले आहेत. यातील एका ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ट्विटमधून तिने दिलजीत आणि प्रियांकाला कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केलाय. याआधी शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटवरून कंगना आणि दिलजीतमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं.

काय म्हणाली कंगना?

कंगनाने लिहिले की, प्रिय दिलजीत दोसांज, प्रियांका चोप्रा जर खरंच शेतकऱ्यांची चिंता असेल, जर खरंच आपल्या मातांचा सन्मान-आदर करत असाल तर ऐका कृषी विधेयक काय आहे! की फक्त आपल्या मातांचा, बहिणींचा आणि शेतकऱ्यांचा वापर करून देशद्रोह्यांच्या गुड बुक्समध्ये यायचं आहे? वाह रे दुनिया वाह...

कंगना ट्विटरवर एक ट्विट रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये यूजरने दिलजीत दोसांज आणि एमी विर्कला टॅग करत लिहिले की, कम्युनिस्ट्स आपल्या मातांचा आणि बहिणींचा वापर राजकीय हितांच्या शोषणासाठी करत आहेत. हे लोक जे पोस्टर्स घेऊन आहेत त्यातील अनेक लोकांना दहशतवादाच्या आरोपाखाली अटक झाली आहे. हे कृषी विधेयकाशी संबंधित नाहीये. तुम्ही या विरोधात बोलणार का? नाही, कारण तू सुद्धा याचाच भाग आहे.

कृषी विधेयकाला विरोध करणाऱ्यांवर साधला निशाणा

यावर कंगनाने लिहिले की, अडचण केवळ हे लोक नाहीत जे त्यांचा सपोर्ट करत आहेत आणि कृषी विधेयकाला विरोध करत आहेत. या सर्वांना हे माहीत आहे की, हे कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचं आहे तरी सुद्धा हे लोक आपल्या फायद्यासाठी निष्पाप शेतकऱ्यांना हिंसा, द्वेष आणि भारत बंदसाठी भडकवत आहेत.

करप्ट सिस्टीमविरोधात कमी लोक

कंगनाने आणखी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भडकवण्यावर लेफ्ट मीडिया दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रासारख्या लोकांची वाह वाह करत राहणार, प्रो इस्लामिस्ट आणि भारत विरोधी फिल्म इंडस्ट्री आणि ब्रॅंन्ड्स त्यांच्यासाठी भरपूर ऑफर्स देतील. समस्या ही आहे की, पूर्ण सिस्टीम अशाप्रकारे तयार झालं आहे की, भारत विरोधी लोक वाढावे आणि या करप्ट सिस्टीम विरोधात फार कमी लोक आहेत. मला विश्वास आहे की चांगल्या आणि वाईटाच्या लढ्यात जादू होईल, वाईट गोष्टी सशक्त झाल्या आहेत. जय श्री राम. 

टॅग्स :कंगना राणौतदिलजीत दोसांझप्रियंका चोप्राशेतकरी संपपंजाब