बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra ) बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेली आणि तिकडेच स्थायिक झाली. अलीकडे एका मुलाखतीत प्रियंका चोप्राने बॉलिवूड सोडून जाण्यामागचं कारण सांगितलं होतं. बॉलिवूडने मला कॉर्नर केलं, माझ्याविरोधात राजकारण केलं, म्हणून मी बॉलिवूड सोडून हॉलिवूडला गेले होते, असं प्रियंका म्हणाली होती. प्रियंकाच्या या मुलाखतीनंतर आता कंगना राणौत (KanganaRanaut) तिच्या बाजूने मैदानात उतरली आहे. करण जोहरनेच (Karan Johar) प्रियंकाला बॅन केलं होतं. करण जोहरमुळेच पीसी बॉलिवूड सोडून हॉलिवूडला गेली, असा दावा कंगनाने केला आहे.
आर्मचेअर एक्स्पर्ट या पॉडकास्ट शोमध्ये प्रियंकाने बॉलिवूडबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते. मला बॉलिवूडमध्ये कॉर्नर केलं जात होतं. चित्रपटांमध्ये घेतलं जात नव्हतं. मला इंडस्ट्रीत गेम खेळता येत नाही, इथल्या राजकारणाला मी कंटाळले होते आणि मला ब्रेक हवा होता. मनासारखं काम हवं होतं. हॉलिवूडमध्ये संधी मिळाली आणि मी तिकडे गेले, असं प्रियंका म्हणाली होती. यावर कंगनाने ट्वीट केलं आहे.
काय म्हणाली कंगना...
करण जोहरला जबाबदार धरत, कंगनाने एका पाठोपाठ एक अनेक ट्वीट्स केले आहेत. प्रियंकाविरोधात लोकांनी गटबाजी केली, तिला बुली केलं आणि बॉलिवूडमध्ये काढून टाकलं. प्रत्येकालाच ठाऊक आहे की, करण जोहरने प्रियंकाला बॅन केलं होतं, असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
करण जोहरने बॉलिवूडला बर्बाद केलं....
कंगनाने आणखी दोन ट्वीट केलेत. त्यात तिने लिहिलंय की, मीडियाने करण जोहरशी प्रियंकाच्या असलेल्या मतभेदांबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिलं कारण शाहरुख आणि चित्रपट माफिया क्रुएला यांच्याशी करणची मैत्री आहे. तो नेहमी अशाच आऊटसाईडर्स शोधात होता. प्रियंकाच्या रूपात त्याला पंचिंग बॅग मिळाली. त्याने प्रियंका चोप्राचा इतका छळ केला की तिला भारत सोडावा लागला. या मतलबी आणि विषारी माणसाला बॉलिवूडचं वातावरण बर्बाद करण्यासाठी जबाबदार ठरवलं गेलं पाहिजे. त्याच्या टोळी आणि माफिया पीआरवर छापे टाकून बाहेरील लोकांना त्रास दिल्याबद्दल त्याला जबाबदार धरले पाहिजे. ”