बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंगनाचे गेल्या दीड वर्षापासून ट्विटर बंद करण्यात आले होते, आता पुन्हा कंगनाचे ट्विटर अकाऊंट परत करण्यात आले आहे, या संदर्भात कंगनाने ट्विट करुन माहिती दिली आहे.
'नमस्कार मित्रांनो. परत आल्यावर खूप छान वाटतं, असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटले आहे.यासोबत 'इमर्जन्सी' चित्रपटाचा मागील दृश्याचा व्हिडिओही शेअर केला आहे. रिलीज डेटची घोषणााही कंगनाने केली आहे. 'इमर्जन्सी'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये तुम्ही पाहू शकता असं ट्विटमध्ये म्हटले आहे.
बाबा निरालाच्या पत्नी पाहिलंत का?, एखाद्या अभिनेत्रीइतकी दिसायला आहे सुंदर, See Pics
कंगना राणौत पुन्हा ट्विटरवर आल्याचे पोहून चाहत्यांनी कमेंट करुन अभिनंदन केले आहे. एका चाहत्याने लिहिले, 'वेलकम बॅक क्वीन'. 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल आणखी एका चाहत्याने म्हटले आहे की, हा कंगना राणौतचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरणार आहे. कदाचित बॉक्स ऑफिस कमाईत सर्वांना मागे टाकेल. कंगना तू खूप छान काम करतेस. जय हो, असं एका चाहत्याने म्हटले आहे. 2021 मध्ये कंगनाचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते.
अभिनेत्री कंगना रणौतने बंगाल निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावर एक वादग्रस्त ट्विट केले होते. यानंतर कंगनाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. याशिवाय कंगना राणौतवर अनेकांनी ट्विटवरुन आरोप केला होता. कंगना सतत ट्विटरची पॉलिसी मोडत आहे. त्यांनी केलेले अपमानास्पद ट्विट ट्विटरच्या धोरणाला हानी पोहोचवत आहेत, असं अनेकांनी तेव्हा म्हटले होते.
ट्विट अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगना राणौत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असते. कंगनाने कू अॅपवर तिचे अकाउंट तयार केले होते. रातोरात कंगना या अॅपची स्टार बनली.