Join us

Kangana Ranaut : 'सिद्धार्थ कियाराची लव्हस्टोरी प्रसिद्धीसाठी...' क्वीन कंगना रणौतच्या कमेंटने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 4:02 PM

सिद्धार्थ आणि कियाराच्या लव्ह स्टोरीवर बॉलिवूडची क्वीन कंगनाची कमेंट

बॉलिवूड कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) काल लग्नबंधनात अडकले. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. या न्यूली वेड कपलचे फोटो कधी येतात याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले होते. काल रात्री दोघांनी लग्नाचे काही खास फोटो शेअर केले. सिद्धार्थ आणि कियाराच्या लव्ह स्टोरीवर बॉलिवूडची क्वीन कंगनाच्या (Kangna Ranaut) कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

रश्मी रॉकेट आणि मलंग सिनेमाचे पटकथा लेखक अनिरुद्ध गुहा यांनी ट्विट केले. 'हे दोघं डेट करत होते ?' असं ट्विट त्यांनी केलं आहे. यावर कंगनाने रिप्लाय दिला आहे. तिने लिहिले, 'हो हे दोघं डेट करत होते. पण कोणत्या ब्रॅंडसाठी किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नव्हे. बॉलिवूडच्या इतर जोडप्यांसारखं प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी नात्याचा वापर केला नाही. अगदी खरं प्रेम, छान जोडी.' 

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात बॉलिवूड मधील काही कलाकारांनीही हजेरी लावली. अभिनेत्री 'जुही चावला', अभिनेता 'शाहीद कपूर' आणि पत्नी 'मीरा राजपूत', दिग्दर्शक 'करण जोहर' सहभागी झाले. शाहीद आणि करणने संगीत मध्ये चांगलीच धमाल आणली.

कियारा आणि सिद्धार्थच्या  शाही विवाह सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर असून हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो. या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारे भाडेही खूप आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्यासाठी १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडे आकारण्यात येते. या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडे आकारले जाते. त्यानुसार सिद्धार्थ-कियाराच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडट्रोलसोशल मीडियासिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी