हिमाचल प्रदेशात आलेल्या पुरामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. सध्या हिमाचल प्रदेशमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. यामुळे अनेक कुटुंबिय प्रभावित झाले आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने पुढाकार घेत 5 लाख रुपयांची मदत पुरामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबाना केली आहे. शिवाय, निधी दान करण्यात अडचण येत असल्याने कमी मदत करु शकली असल्याचे तिने म्हटलं. यावरुन तिने हिमाचल सरकारला धारेवर धरले.
कंगनाने मुख्यमंत्री सहायता निधीतील तांत्रिक बिघाडाचा मुद्दा उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. कंगनाच्या आधी प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननेही हिमाचल सरकारला २५ लाख रुपयांची मदत केली होती. कंगना ही मुळची हिमाचलमधल्या मंडी जिल्ह्यातील आहे. मंडी जिल्हा हा उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश राज्यातील मध्यवर्ती जिल्ह्यांपैकी एक आहे. तिचा गृह जिल्हा हा सर्वाधिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे.
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचे झाल्यास, नुकताच तिचा 'चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच तिचा 'तेजस' हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवाय ती 'इमरजेंसी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात तिच्यासोबत श्रेयस तळपदे, अनुपम खेर, सतीश कौशिक, महिमा चौधरी असे अनेक कलाकार असतील.