रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांचा चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rockey Aur Rani Ki Prem Kahani) चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने फारसे कलेक्शन केले नाही. या चित्रपटाद्वारे करण जोहर दीर्घ काळानंतर दिग्दर्शनात परतला आहे. सात वर्षांनी तो दिग्दर्शनाकडे परतला आहे. आता बॉलिवूड क्वीन कंगना रणौत करण जोहरवर भडकली आहे. तिने करण जोहरच्या चित्रपटाची तुलना मालिकेशी केली असून निवृत्तीचा सल्ला दिला आहे.
कंगना राणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने करण आणि स्टारकिड्सला टोमणा मारला आहे. कंगनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, भारतीय प्रेक्षक अण्वस्त्रांची उत्पत्ती आणि अणुविज्ञानाच्या गुंतागुंतीवरचा ३ तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि तेथे नेपो गँग आणि सासू सूनेचं रडगाणे आहे, परंतु डेली सोप बनवण्यासाठी २५० कोटी काय आवश्यक आहे.
कंगनाने पुढे लिहिले की, करण जोहर, एकच चित्रपट अनेकवेळा करताना तुला लाज वाटली पाहिजे. स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा नेता म्हणवतो आणि सर्वांना मागे खेचतो. फंड वाया घालवू नका कारण ही इंडस्ट्रीसाठी वाईट वेळ आहे. निवृत्त व्हा आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवू द्या.
रॉकी और रानी की प्रेम कहानीबद्दल बोलायचे तर रणवीर आणि आलियाशिवाय या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.१० कोटींचा व्यवसाय केला आहे, जो वीकेंडला वाढणार आहे.