Kangana Ranaut:बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'धाकड' (Kangana Ranaut Dhaakad) चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून बरा ते चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, या चित्रपटाबाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. कंगना राणौतचा 'धाकड' चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
'धाकड' ऑनलाईन लीक झाला आहेकंगना राणौतचा 'धाकड' हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये अनेक वेबसाइटवर लीक झाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या व्यवसायाला मोठा फटका बसू शकतो. कारण लोक हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याऐवजी ऑनलाईन डाउनलोड करून पाहण्यास सुरुवात करतील. मात्र, हा चित्रपट लॅपटॉप किंवा मोबाईलवर नाही तर थिएटरमध्येच पाहण्यात मजा येईल.
हे चित्रपटही ऑनलाइन लीक झाले आहेतरिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाइन लीक झालेला 'धाकड' हा पहिला चित्रपट नाही. आज रिलीज झालेला 'भूल भुलैया 2' देखील ऑनलाईन लीक झाला आहे. याशिवाय, 'हिरोपंती 2', 'रनवे 34', 'अर्चाय' आणि रणवीर सिंगचा '83' हे चित्रपटही रिलीजच्या दिवशीच ऑनलाइन लीक झाले आहेत.
धाकडमध्ये हे कलाकाररजनीश घई दिग्दर्शित कंगना राणौतचा 'धाकड' हा स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे. याची निर्मिती दीपक मुकुट आणि सोहेल मकलाई यांनी केली आहे. कंगना राणौतचा हा पहिला अॅक्शन सिनेमा आहे, ज्यामध्ये तिने धोकादायक स्टंट केले आहेत. कंगनाशिवाय या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता यांनी काम केले आहे. कंगना राणौत शेवटची 'थलायवी' चित्रपटात दिसली होती. तिच्या उत्कृष्ट अभिनयानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता कंगनाला 'धाकड' चित्रपटाकडून खूप आशा आहे.