Oscar Awards 2023: अमेरिकेच्या लॉस एंजिलिस (Los Angeles) येथे पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय कलाकारांनीही दिमाखात हजेरी लावली. एस एस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉंगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. 'आरआरआर'च्या संपूर्ण टीमने एकच जल्लोष केला. तर याशिवाय सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही (Deepika Padukone) लक्ष वेधले. 'नाटू नाटू'ला पुरस्कार मिळताच दीपिका भावूक झालेली दिसली. तर तिने स्टेजवरुन केलेले भाषणही कौतुकास्पद होते. खुद्द क्वीन कंगना राणौतनेही (Kangana Ranaut) दीपिकाचं कौतुक केलं आहे.
Oscars 2023: ‘नाटू नाटू’ला ऑस्कर! एस. एस. राजामौली यांच्या RRRची ऐतिहासिक कामगिरी
95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दीपिका पदुकोण काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दाखल झाली. तिच्या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. 'नाटू नाटू' गाण्याच्या परफॉर्मन्सची घोषणा करताना दीपिकाने दिलेले स्पीच लक्षवेधी आहे.
Oscar Awards 2023: भारताला मिळाला पहिला ऑस्कर, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास
कंगनाने दीपिकाच्या याच धाडसाचं कौतुक केलं आहे. त्या मंचावर उभं राहून बोलणं सोप्पं नाही असं तिने म्हणलं आहे. कंगनाने ट्वीट केलं, 'दीपिका किती सुंदर दिसत आहे. देशाचं प्रतिनिधित्व करत देशाचं नाव, प्रतिमा, शान आपल्या नाजुक खांद्यावर घेत इतक्या आत्मविश्वासाने आणि सुंदररित्या तिथे उभं राहून बोलणं सोपं नाही. दीपिकाचं स्पीच भारतीय महिला बेस्ट आहेत हेच दाखवून देतं.'
'नाटू नाटू' गाण्यासाठी स्टॅंडिंग ओव्हेशन! परफॉर्मन्सची घोषणा करताना अडखळली दीपिका पदुकोण
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'आरआरआर'च्या 'नाटू नाटू' गाण्याने ते करुन दाखवलंय जे आजपर्यंत कोणालाही जमलेलं नाही. 'नाटू नाटू' ला बेस्ट ओरिजिनल सॉंगचा पुरस्कार मिळाला. संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी (MM Keerawani) आणि लेखक चंद्रबोस (Chandrabose) यांनी पुरस्कार स्वीकारला.