बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमी बिन्धास्तपणे मतं मांडत असते. तसंच बॉलिवूड आणि इंडस्ट्रीतील माफियांना ती टार्गेट करते. तिने आता डार्क वेबचा मुद्दा मांडला आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने नुकतंच जाहीर केलं की आता फोन करणाऱ्या व्यक्तीचा केवळ नंबरच नाही तर त्याचं नावही दाखवलं जाणार ज्याच्या नावावर नंबर रजिस्टर आहे. कंगनाने 'ट्राय'च्या या निर्णयाचं समर्थन करत डार्क वेबबद्दलही मत व्यक्त केलं.
कंगना रणौतने पोस्ट करत लिहिले, "शानदार...केंद्राने डार्क वेबवरही काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध लोक याला जोडले गेले आहेत. हे लोक फक्त कन्फ्युजन वाढवत नाही तर व्हॉट्सअॅप आणि जीमेलही हॅक करतात. जर या प्रकरणात चौकशी केली तर अनेक मोठी नावं समोर येतील."
कंगनाच्या या नवीन वक्तव्यामुळे आता फिल्म इंडस्ट्रीतही चर्चा सुरु झाली आहे. यावर सेलिब्रिटींची काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं असणार आहे. कंगनाच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं तर तिचे गेले काही सिनेमे फ्लॉप झाले आहेत. 'धाकड','पंगा','तेजस','मणिकर्णिका' असे अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. आता तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाची चर्चा. या सिनेमाकडून तिला खूप अपेक्षा आहेत. यामध्ये तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.