Join us

Kangana Ranaut : तो सर्वनाश होता है..., उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर कंगना राणौतचा शिवसेनेला जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:13 PM

Maharashtra Political Crisis, Uddhav Thackeray, Kangana Ranaut : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वातआधी कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. कंगनाने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Maharashtra Political Crisis l महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतची (Kangana Ranaut) प्रतिक्रिया आली आहे. कंगना व उद्धव ठाकरे सरकारमधील एकेकाळी गाजलेलं ‘वॉर’ सगळ्यांनाच ठाऊक आहे. कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने बुलडोजर चालवला होता आणि या कारवाईमुळे संतापलेल्या कंगनाने उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. ‘आज मेरा घर टूटा है, जल्द ही तेरा घर टूटेगा,’ अशा शब्दांत तिने ठाकरे सरकारला ललकारलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सर्वातआधी कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

कंगनाने तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘जब पाप बढ जाता है, तो सर्वनाश होता है और उस के बाद सृजन होता है,’ असं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे.

व्हिडीओत ती म्हणते,1975 नंतर भारताच्या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. 1975 मध्ये लोकनेते जय प्रकाश नारायणच्या एका गर्जनेने सिंहासन कोसळलं होतं. 2020 मध्येच मी म्हटलं होतं की, लोकशाही एक विश्वास आहे. जे लोक सत्तेचा गर्व, अहंकार बाळगत जनतेचा विश्वास तोडतात, त्यांचं गर्वहरण निश्चित होतं. ही कुण्या व्यक्तिची शक्ती नाही. ही शक्ती आहे, एका सच्च्या चरित्राची.  हनुमानजीला शिवाचा 12 वा अवतार मानलं जातं आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालिसा बॅन करत असेल तर तुम्हाला शिव सुद्धा वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जयहिंद, असं कंगनाने या व्हिडीओत म्हटलं आहे.

टॅग्स :कंगना राणौतउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षशिवसेना