अलीकडे ‘मीटू’ मोहिमेवर बोलून राणी मुखर्जी चांगलीच फसली. ‘मीटू’वर राणीने असा काही मुद्दा मांडला की, ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. ‘मीटू’वर चर्चा करताना राणीने मुलींनी मार्शल आर्ट्स शिकण्याची गरज व्यक्त केली. मुलींनी,महिलांनी स्वत:च्या संरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकावे. शाळेच्या अभ्यासक्रमातही याचा समावेश व्हावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असावे, असे राणी म्हणाली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग काय, नेटकºयांनी राणीवर निशाणा साधला. राणीकडे ना मुद्दा आहे, ना विचार, असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने जास्त बोलण्याने आपण जास्त प्रभावी ठरू, असे कदाचित राणीला वाटत असावे, असे लिहिले. एकंदर काय तर मीटूवर बोलणे राणीला चांगलेच महागात पडले. आता कंगना राणौतने राणीच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘आपल्या समाजात ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांना ती मिळायला हवी. पण येथे राणी लक्ष्मीबाईसारख्या धाडसी मुली असतील तर त्यांचा आदर व्हायलाच हवा. राणी लक्ष्मीबाईसारख्या महिला आपल्या समाजात असतील तर त्यावर आपल्याला आक्षेप असता कामा नये,’ असे कंगना म्हणाली.
यावेळी बोलताना कंगनाने स्वत:चाही दाखला दिला. मी १६ वर्षांची होते, तेव्हा माझ्यासोबतच्या गैरवर्तनाविरोधात मी एफआयआर दाखल केली होती. स्वत:च्या हक्कासाठी लढणा-यांच्या पाठीशी आपण उभे व्हायलाचं हवे. आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक आहेत, जे समाजाला ताकद देतात, प्रेरणा देतात, असे कंगना म्हणाली.