Join us

आईचा आशिर्वाद घेऊन नवनिर्वाचित खासदार कंगना निघाली दिल्ली दरबारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 5:24 PM

खासदार झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहे.

सध्या सगळीकडे अभिनेत्री कंगना रणौत हिची चर्चा रंगली आहे. कंगनाने लोकसभा निवडणुकीत गुलाल उधळला. हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारासंघातून तिनं विजयाची पतका फडकावली. पहिल्याच प्रयत्नात कंगनाने खासदारकी मिळवली आहे. अभिनयानंतर आता कंगना राजकारणात आपला डंका वाजण्यासाठी सज्ज झाली आहे.  खासदार झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचणार आहे.

कंगना हिनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात मंडी येथून दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती तिनं दिली. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ती संसदेत पाऊल ठेवणार आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये कंगना तिच्या आईसोबत दिसून येत आहे. एका फोटोला तिनं 'दिल्ली बोलवतेय' असं कॅप्शन दिलं.  कंगनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. 

मंडी ही कंगनाची जन्मभूमी आहे. तिचं संपूर्ण कुटुंब मंडीतच वास्तव्यास आहे. आता कंगना बॉलिवूड सोडून पुन्हा मंडीत स्थायिक होण्याची चर्चा आहे. खासदार झाल्याने ती तिथेच राहून जनतेची सेवा करणार आहे.  मंडी मतदार संघात कंगनाच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते (BJP). पण तिने जोरदार प्रचार करीत विजय मिळवला. कंगनाचा अभिनेत्री ते राजकारणातला प्रवास सोपा नव्हता.

खासदार झाल्यानंतर कंगना अभिनय कारकीर्द पुढे चालू ठेवणार का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. कंगनाचा मोस्ट अवेटेड चित्रपट "इमर्जन्सी' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.  प्रत्येकजण त्याच्या रिलीजची वाट पाहत आहे. या चित्रपटात तिनं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. कंगना ही स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी खूप प्रसिद्ध आहे, कंगना प्रत्येक मुद्द्यावर परखडपणे मत मांडते.  कदाचित म्हणूनच तिला इंडस्ट्रीची क्विन देखील म्हटलं जातं. बॉलिवू़मध्ये आपल्या कामाने तिनं मोठा चाहतावर्ग मिळवला आहे. आता राजकारणात कंगनाचे काम पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.  

 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडहिमाचल प्रदेश