बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते आणि तिच्या पोस्ट तुफान व्हायरल होतात... पण, सोशल मीडियावर तेढ निर्माण करणारे व आपत्तीजनक भाषा वापरणाऱ्या कंगनाचे ट्विटर अकाऊंट रद्द करण्यात आले. त्यानंतर ती इंस्टाग्रामवर अधिक सक्रिय झाली आहे, परंतु तिला आता नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि स्वतःच्याच अकाऊंटवर पोस्ट लिहिण्यासाठी तिला बहिणीच्या फोनचा वापर करावा लागत आहे.
'पंतप्रधान मोदींच्या ४-५ वर्षांच्या अथक परिश्रमामुळे नीरज चोप्रासारखे तरुण ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताहेत!'
तिनं लिहिलं की,''काल रात्री चीनमधून माझं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाला. तसा इंस्टाग्राम अलर्ट मला मिळाला, पण तो लगेचच नाहीसा झाला. आज सकाळी जेव्हा मी जेव्हा अकाऊंट पाहिलं तेव्हा त्यावरून तालिबान्यांसदर्भातील सर्व पोस्ट नष्ट झाल्या होत्या. माझं अकाऊंट डिअॅबल झालं होतं. यासंदर्भात इंस्टाग्रामशी बोलल्यानंतर मला ते वापरता येतंय, परंतु मी काही लिहिण्याचा प्रयत्न करतेय, तेव्हा अकाऊंट लॉगआऊट होतंय. हे असं वारंवार होतंय.''
''ही स्टोरी लिहिण्यासाठी मला माझ्या बहिणीचा फोन वापरावा लागत आहे. हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे,''असे कंगनाने लिहिले.
काही दिवसांपूर्वी कंगनाने इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही सुपर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. मात्र काही लोकांना तिचा हा सुपर ग्लॅमरस अवतार फारसा रूचलेला दिसत नाही. सोशल मीडियावरच्या काही प्रतिक्रियांवरून तरी हेच दिसतेय. कंगना सध्या बुडापेस्ट येथे ‘धाकड’ (Dhaakad) या आगामी सिनेमाचे शूटींग करतेय. शूटींग संपले आणि यानंतर रॅपअप पार्टीआधीचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.