अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावरुन अनेकांची कानउघाडणी करत असते. समोर कोणीही असो ती सडेतोड तिचं म्हणणं मांडत असते. बॉलिवूडचीही पोलखोल तिने केली आहे. अनेकदा ती तिच्या वक्तव्यांमुळे ट्रोलही होते. आता नुकतेच कंगनाने ट्विटरवरुन एका मुलीला झापलं आहे. मंदिरात वेस्टर्न कपडे घालण्यावरुन तिने कानउघाडणी केली आहे.
निखी उनियाल या ट्विटर हँडलवरुन त्याने वैजनाथ मंदिराचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका मुलीने शॉर्टस आणि स्लीव्हलेस क्रॉप टॉप घातला आहे. त्याने लिहिले, "हे हिमाचल प्रदेशच्या प्रसिद्ध वैजनाथ मंदिराचं दृश्य आहे. मंदिरात असे आले आहेत जसे काय कोणत्या पब किंवा नाईट क्लबमध्ये गेले आहेत. अशा लोकांना मंदिरात येण्याची परवानगीच नाही दिली पाहिजे. मी याचा तीव्र विरोध करतो. हे वाचून तुम्ही मला कितीही छोट्या किंवा घाणेरड्या विचाराचा समजलात तरी मला ते मान्य असेल."
हेच ट्वीट रिट्वीट करत कंगना म्हणाली, "हे वेस्टर्न कपडे आहेत जे इंग्रजांनी बनवले आहेत आणि प्रमोट केले आहेत. एक दिवस मी व्हॅटिकनमध्ये होते आणि मी शॉर्ट्स घातले होते. मला त्या परिसरात प्रवेशच घेऊ दिला नाही. मला हॉटेलमध्ये जाऊन कपडे बदलावे लागले. कॅज्युअलसारखे हे लोक नाईट ड्रेसेस घालून आहेत त्यांचा हेतू भलेही वाईट नसेल पण अशा मुर्खांसाठी कडक नियम असायला हवेत."
कंगना मनालीची आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर हिमाचल प्रदेशची संस्कृती प्रमोट करताना दिसते. नुकतीच तिने हरिद्वारच्या तिच्या ट्रिपची झलक दाखवली. कंगना लवकरच 'इमर्जन्सी' सिनेमात दिसणार आहे. त्यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे.