कंगना राणौतचा लवकरच बॉक्स ऑफिसवर 'पंगा' सिनेमा रिलीज होणार आहे. पंगा सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगना एका लग्न झालेल्या कबड्डी खेळाडूची भूमिका साकारणार आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार कंगानाला ट्रेलर लॉन्चच्या दरम्यान तिच्या लग्नाच्या प्लॅनबाबत विचारण्यात आले. यावर कंगना म्हणाली, लग्नाचे तर मला माहिती नाही. पण जेव्हा लग्न करेन त्यावेळी तो मुलगा माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजेंट, सुंदर आणि माझ्यापेक्षा जास्त हुशार असला पाहिजे. ऐवढेच नाही तर पंगा सिनेमाची दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीदेखील म्हणाली, कंगाना लग्नाची सगळी तयारी केली आहे, कंगनाचे लग्न कुठे होणार आणि लग्नात जेवायला काय मेनू असणार. आता फक्त कंगना योग्य मुलाची वाट बघतेय.
कंगनाच्या लग्नाबाबत दिग्दर्शिका अश्विनी अय्यरने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 4:23 PM