काही कलाकार असे आहेत की ज्यांच्या घरांची किंमत काही कोटी इतकी आहे. घर जितके आलिशान तितकेच घरातील फर्निचर आणि सजावटीच्या वस्तूही महागड्या असतात. यामध्ये सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूड क्विन आणि खासदार कंगना राणौत हिचं नावं आघाडीवर आहे. कंगनाचं मुंबईत अत्यंत आलिशान घर आहे. जे आता तिनं विकायला काढलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत कंगना ही मंडी मतदारसंघाची खासदार बनली. खासदार बनल्यानंतर कंगनाने बॉलिवूड थोडं दूर सारलं असून आपलं पुर्ण लक्ष राजकारण केंद्रित केलं आहे. कंगनाचा सुंपर्ण वेळ हा सध्या दिल्ली आणि मतदारसंघ मंडीमध्ये जात आहे. त्यामुळेच ती पाली हिलमधीलघर विकणार आहे, अशी चर्चा आहे.
कंगनाच्या याच घरात मणिकर्णिका फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसचे ऑफीसही आहे. कंगना हे आलिशान घर 40 कोटी रुपयांना विकणार आहे. कोड इस्टेट नावाच्या यूट्यूब चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये कंगनाचं घर आणि प्रोडक्शन हाऊसचे कार्यालय विक्रीसाठी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या बातमीत किती तथ्य आहे ही माहिती मात्र समजू शकलेलं नाही. मात्र अद्याप कंगनाने यावर कोणतेतही वक्तव्य केलेले नाही.
हे तेच घर ज्यावर मुंबई महापालिकने कारवाई केली होती. सप्टेंबर 2020 मध्ये बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत कंगनाच्या घराचा काही भाग पाडला होता. ९ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतर तोडण्याचे काम मध्यंतरी थांबवण्यात आले होते. कंगनाने बीएमसीविरुद्ध खटला दाखल केला आणि बीएमसीकडून भरपाई म्हणून २ कोटी रुपयांची मागणीही केली, परंतु मे २०२३ मध्ये तिने आपली मागणी मागे घेतली होती.