Join us

आणि कंगना राणौतने बनली बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 17:13 IST

कंगाना सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगना राणौत जे काही करते ते खासच असते म्हणूनच बॉलिवूडची क्वीन म्हणूनही आता तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. विविध सिनेमातून तिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे ती अभिनय करत असलेल्या प्रत्येक सिनेमाशी संबंधित गोष्टींची चर्चा तितकीच रंगत असल्याचे पाहायला मिळते. थलाइवी सिनेमात कंगना दिसणार आहे. हा सिनेमा  दिवंगत पूर्व तमिलनाडुच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांचा बायोपिक आहे.

या सिनेमासाठी कंगनानेही खूप मेहनत घेतली आहे. या सिनेमासाठी ती भरतनाट्यम आणि तमिळ भाषा सुद्धा शिकली आहे. विशेष म्हणजे जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाने 24 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. कंगाना सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात 1965 पासून ते 1973 पर्यंत जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी सुमारे 28 चित्रपटांमध्ये काम केले होते. जयललिता यांचा एमजीआर यांच्यासोबतचा पहिला चित्रपट 'आइराथिल ओरुवन' होता.

 जो 1965 मध्ये आला होता. त्यांना राजकारणात आणण्यातही एमजीआर यांची महत्वाची भूमिका होती. चित्रपटात हा रोल अरविंद स्वामी साकारत आहेत.या सिनेमाची घोषणा झाली अगदी तेव्हा पासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘थलायवी’हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कंगना राणौतथलायवी