Join us

एक और नॅशनल अवार्ड पक्का...!  ‘थलायवी’चा ट्रेलर पाहून कंगनाचे फॅन्स खूश्श

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:12 IST

Thalaivi Trailer Out : ट्रेलरमधील दमदार डायलॉग आणि सीन काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

ठळक मुद्देथलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

कंगना राणौतच्याथलायवी’ या सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च झाला आणि सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही लोकांना ट्रेलर इतका आवडला की, त्यांनी कंगनाचे कौतुक सुरु केले. काही लोकांनी मात्र हा ट्रेलर पाहून नको त्या प्रतिक्रिया दिल्यात.  कंगनाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये जयललिता यांचा अभिनयापासून राजकीय क्षेत्रापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.  3 मिनीट 15 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये जयललिता यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्पे दाखवण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्यात कंगनाचा एक वेगळा लूक पाहायला मिळत आहे.थलायवी हा चित्रपट जयललिता यांच्या जीवनावर अधारित असून, एक यशस्वी अभिनेत्री ते महत्वाकांक्षी नेता असा 30 वर्षांचा जीवनप्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.  हा चित्रपट 23 एप्रिल 2021 रोजी तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमधून जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

एकच सीन सगळ्यांवर भारी...ट्रेलरमधील दमदार डायलॉग आणि सीन काही वेळातच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.  ट्रेलरमध्ये एक सीन संसदेचा आहे. या सीनमध्ये काळ्या रंगाची साडी नेसलेली कंगना रागारागात बाहेर पडताना दिसतेय. हा सीन कंगनाच्या अनेक चाहत्यांना आवडला. अनेक युजर्सनी या सीनचे स्क्रीनशॉट शेअर करत, ‘अकेला यही सीन सारे अवार्ड ले आएगा....,’ अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.  काहींनी मात्र हा ट्रेलर पाहून कंगनाला ट्रोलही केले. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.  

टॅग्स :थलायवीकंगना राणौत