Join us

दीपिका नाही तर कंगना होती 'पद्मावत'साठी संजय लिला भन्साळींची पहिली चॉईस !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 6:00 AM

आगामी काळात कंगना रणौत एकता कपूरचा 'मेंटल है क्या' आणि अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात झळकणार आहे. तसेच तमिलनाडुच्या दिवंगत पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमात झळकणार आहे.

ब-याचवेळा सिनेमा बनवताना दिग्दर्शकाच्या पसंतीनुसारच कलाकारांची निवड होते असे नाही. कधी कलाकारांना भूमिका आवडत नाही, तर कधी काही कारणामुळे कलाकार त्या भूमिकांना स्विकारत नाहीत.बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक रंगते. नुकत्याच एका कार्यक्रमात कंगणाने 'पद्मावत' सिनेमासाठी संजय लिला भन्सालीची पहिली चॉईस कंगणा  असल्याचे सांगितले आहे.

मात्र तिनेच 'पद्मावत' सिनेमाची ऑफर धुडकावून लावली. त्यावेळी कंगणा 'मणिकर्णिका क्वीन ऑफ झाँसी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. म्हणून 'पद्मावत' सिनेमा करता आला नसल्याचे तिने सांगितले.  तसेच पद्मावत आधी संजय लिला भन्साली यांनी 'गोलियों की रासलीला' या गाण्यासाठी मला विचारले होते त्यावेळीही त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली नसल्याचे तिने सांगितले.

आगामी काळात कंगना रणौत एकता कपूरचा 'मेंटल है क्या' आणि अश्विनी अय्यर तिवारीच्या 'पंगा' सिनेमात झळकणार आहे. तसेच तमिलनाडुच्या दिवंगत पूर्व मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित बायोपिक सिनेमात झळकणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगलाही सुरूवात होणार असून खास सिनेमासाठी कंगणा तामिळ भाषेचे धडे गिरवत असल्याचे समजतंय.  सिनेमातले सीन तमिळमध्ये असणार आहेत.  कंगना या सिनेमाला घेऊन खूपच उत्साही असल्याचे ती म्हणाली. हिंदीत 'जया' तर तामिळ भाषेत 'थलाईवी' असे सिनेमाचे नाव असणार आहे. ए.एल. विजय या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून कवी विजयेंद्र प्रसाद यांनी या सिनेमाचे लेखन केले आहे.      

जयललिता या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. अभिनयात मिळालेल्या यशानंतर त्या राजकारणाकडे वळल्या. त्यांनी तेलगू, कन्नड तसेच बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. तामिळनाडूच्या त्या माजी मुख्यमंत्री होत्या. त्यांचे निधन 2016 मध्ये झाले. कंगना या बायोपिकमध्ये काम करण्यासाठी तब्बल कंगनाने २४ कोटी रूपयांची भरभक्कम फी मागितली असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :कंगना राणौतपद्मावतदीपिका पादुकोण