आदित्य पंचोलीबरोबर कंगनाने पहिल्यांदा पंगा घेतला होता. कंगनाचा कोणाशी ना कोणाशी पंगा घेण्याचा सिलसिला हा आजतायगायत सुरूच आहे. इंडस्ट्रीमध्ये कंगनाच्या करिअरच्या सुरूवातीला आदित्य पंचोलीसह तिचे सूत जुळले. ती सतत त्याला फोन करायची त्यामुळे त्याला कंगना आवडू लागती होती. तेव्हा आदित्या हा विवाहीत होता तरीही तो तिच्या प्रेमात पडला. आदित्या कंगनासाठी एक वेगळा फ्लॅटही घेवून दिला होता. त्यात फ्लॅटमध्ये कंगना राहायची. आदित्यमुळे तिच्या इंडस्ट्रीत खूप ओळखीही झाल्या. दिवसेंदिवस दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. त्यानंतर दोघांनीही एकत्र राहण्यास सुरूवात केली. काही वर्ष एकत्र राहत असताना आदित्याने कंगनाला पत्नीचाही दर्जा दिला होता.
वेळेनुसार दोघांमध्येही खटके उडू लागले दोघांमध्ये भांडण होत राहिली. सिनेमाच्या शूटिंगवेळी आदित्यने कंगनाचा फोन चेक केला तेव्हा कंगना एका अभिनेत्याला केलेल मेसेज पाहून आदित्यलाही धक्का बसला होता. आदित्यबरोबर राहत असताना ती जे त्याला बोलायची तेच ती कंगना त्या अभिनेत्यासह बोलत असल्याचे पाहून आदित्यने कंगनावर हात उगारला होता. काही दिवसांनी कंगणा एका पार्टीत गेली होती तिथे आदित्य तिला शोधत पोहचला आणि तो दिसताच ती तिथून पळून गेली होती. आदित्यने तिचा पाठलाग केला आणि ती ज्या रिक्षामध्ये होती त्याला थांबवून खाली उतरवले. कालांतराने दोघांचे नाते संपले .
त्यानंतर कंगनाचे शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमनबरोबर नाव जोडले गेले. तेव्हा शेखर सुमनने मध्यस्ती करत अध्ययनला कंगनापासून दूर केले आणि दोघांमध्ये प्रेम नसून ते केवळ एक आकर्षण असल्याचे स्पष्टीकरण शेखर सुमनने दिले होते. तर 2016 मध्ये अध्ययन सुमनने डीएनएला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने कंगनावर गंभीर आरोप केले होते. रिलेशनशिपदरम्यान कंगनाने माझा अतोनात शारीरिक व मानसिक छळ केला होता. ती मला मारायची, शिव्या द्यायची़ एकदा तिने मला सँडलही फेकून मारली होती, असे अध्ययन या मुलाखतीत म्हणाला होता.
कंगनाने अजय देवगनसह अफेअर सुरू झाले. तेव्हा अजय काजोलसह लग्नबंधनात अडकला होता. तरीही त्याची कंगनाशी जवळीक वाढू लागली होती.काजोलच्या कानावर दोघांच्या अफेरअरच्या चर्चा आल्या तेव्हा तिच्याच मध्यस्तीन अजय कंगनापासून दूर झाला.
त्यानंतर कंगनाने निशाणा साधला तो बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनवर. हृतिकसह कंगनाने जीवापाड प्रेम केले. मात्र तरीही हृतिकने कंगनासह अफेअर नसल्याचे सांगितले होते. तेव्हा हृतिकचा सुजैन खानसह घटस्फोट झाला होता. हृतिकने कंगनासह लग्न करण्याचे वचनही दिल्याचे कंगनाने म्हटले होते.