कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वी चर्चा झाली आणि प्रदर्शनानंतरही चर्चा होतेय. होय, कंगनाच्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धूम केली असून रिलीजनंतरच्या तीनचं दिवसांत ४२. ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे.रिलीजच्या पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात करत, या चित्रपटाने ८.७५ कोटी रूपये कमावले. यानंतर दुस-याचं दिवशी सगळ्यांना धक्का देत, थेट १८.१० कोटींवर झेप घेतली. काल रविवारी हा चित्रपट पाहायला प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि या चित्रपटाने १५.७० कोटींची कमाई केली. कमाईचा एकूण आकडा ४२.५५ कोटीच्या घरात आहे. याच बरोबर कंगनाचा हा चित्रपट या नव्या वर्षांत पहिल्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. यापूर्वी ‘उरी’ या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये ३५. ७३ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट पुढील काही दिवसामध्ये आणखी कमाई करु शकतो असे जाणकारांचे मत आहे.
‘मणिकर्णिका’सोबतच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या दिवशी ठाकरेने ६ कोटींची कमाई केली. गत शनिवार व रविवारी १०-१० कोटी कमावले. ‘ठाकरे’हा बाळासाहेबांच्या जीवनावर आधारित तर ‘मणिकर्णिका’ झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित. मात्र एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांच्या कमाईच्या आकडेवारीमध्ये ‘मणिकर्णिका’ने ‘ठाकरे’वर मात केल्याचे पाहायला मिळतेय.