Join us

पाहा कसा दिसतो कंगना राणौतचा अलिशान बंगला, एखाद्या राजवाड्याइतका आहे सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2019 6:00 AM

कंगनाने तिच्या कुटुंबियांसाठी एक अलिशान बंगला बनवला आहे. हा बंगला अतिशय सुंदर असून तो एखाद्या राजवाड्यासारखाच आहे.

ठळक मुद्देकंगनाच्या या बंगल्याचे २०१८ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हा बंगला बनवण्यासाठी तिने ३० करोड खर्च केले आहेत. या बंगल्यासाठी तिने जमीन १० करोडला घेतली होती तर बांधकामासाठी तिने २० करोड रुपये खर्च केले आहेत. 

कंगना राणौतने आज तिच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये तिचे एक स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते. तिने आजवर क्वीन, तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स, फॅशन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या भूमिकेसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला असून तिच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. तिचा जजमेंटल है क्या हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे तर प्रचंड कौतुक केले जात आहे. 

कंगनाचे बालपण हे हिमाचलमधील मंडी येथे गेले आहे. पण ती गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या कामाच्या निमित्ताने मुंबईत राहात आहेत. कंगना मुंबईत राहात असली तरी हिमाचल प्रदेश आणि तिथले वातावरण तिला अधिक आवडते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही आणि त्याचमुळे तिने तिच्या कुटुंबियांसाठी मनालीमध्ये एक अलिशान बंगला बनवला आहे. हा बंगला अतिशय सुंदर असून तो एखाद्या राजवाड्यासारखाच आहे. या बंगल्याचे फोटो कंगनानेच तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते.

कंगनाच्या या बंगल्याचे २०१८ मध्ये बांधकाम पूर्ण झाले. हा बंगला बनवण्यासाठी तिने ३० करोड खर्च केले असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. या बंगल्यासाठी तिने जमीन १० करोडला घेतली होती तर बांधकामासाठी तिने २० करोड रुपये खर्च केले आहेत. 

कंगनाने या घराच्या इंटेरिअरवर देखील प्रचंड खर्च केला आहे. या घराचे इंटेरिअर रिचा बहलने केले असून रिचा ही प्रसिद्ध दिग्दर्शक विकास बहलची पत्नी आहे. विकासच्या क्वीन या चित्रपटात कंगनाने काम केले होते. 

कंगनाच्या या घरात आठ बेडरूम असून डायनिंग रूम, फायर प्लेस, जिम, योगा रूम यांसारखे विविध रूम आहेत. या बंगल्याला विंटेज स्टाईलने सजवण्यात आले आहे. या घरातून हिमाचलमधील बर्फाच्छादित प्रदेशाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. 

 

टॅग्स :कंगना राणौतहिमाचल प्रदेश