कंगनाची बहीण रंगोली भडकली, रणबीर-दीपिकाच्या नात्यावर नको ते बोलली!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 10:37 AM2019-10-11T10:37:56+5:302019-10-11T10:39:41+5:30
दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली.
दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. दीपिकाने मुलाखतीत बोलताना कंगना व राजकुमार राव स्टारर ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा उल्लेख केला होता. ‘मानसिक आरोग्याप्रति आजही आपल्या समाजात जनजागृतीचा अभाव आहे. ‘मेंटल है क्या’ नावाचा चित्रपट वा असे कुठले पोस्टर रिलीज करताना आपल्या अधिक संवेदनशील होण्याची गरज आहे,’ असे दीपिका या मुलाखतीत म्हणाली होती. दीपिकाची नेमकी हीच गोष्ट रंगोलीला खटकली आणि तिने एका पाठोपाठ एक ट्वीट करत दीपिकाला धारेवर धरले.
Ha ha ha a woman in steady relationship with another man goes on record and says that I still love my ex boyfriend’s boxers, for bollywood this is class, matlab english mein kachche ko boxer bolo toh classy hai...(contd) https://t.co/KnmiQfRiXs
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 10, 2019
आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये रंगोलीने दीपिका व रणबीरच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘हा हा हा... एक महिला दुस-या पुरूषासोबत नाते बनवून ठेवते आणि ऑन रेकॉर्ड मला माझ्या एक्स-बॉयफ्रेन्डचे बॉक्सर आत्ताही आवडतात, असे म्हणते. बॉलिवूडसाठी हा क्लास आहे. याचा अर्थ इंग्रजीत अंर्तवस्त्राला बॉक्सर म्हटले तर ते क्लासी आहे, ’असे ती म्हणाली.
(contd)...aur Kangana makes highly acclaimed film on Mental illness magar usse bhi problem hai... wah!! Achcha hai tum logon jaise classy nahin hai, Kangana still feels we must normalise word Mental... 🙏”
— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 10, 2019
Sorry Kangana ko depression ka natak nahin aaya, heroes ke kachche media ke samne nahin sukhaye, instead she played a mental illness patient to perfection made a film on illness and prejudice around it...(Contd)— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 10, 2019
(Contd).... kitni naadaan hai, image nahin bana payi public aur media ko ungaliyon pe nahin ghuma payi, bas honestly apne kaam mein lagi hai, us se jayada stupid koi hai? Khelne wale toh khel rahe hain 😁😁😁👏👏👏— Rangoli Chandel (@Rangoli_A) October 10, 2019
ती इथेच थांबली नाही तर पुढच्या ट्वीटमध्ये तिने लिहिले, ‘कंगनाने मेन्टल इलनेसवर एक शानदार चित्रपट बनवला आहे. पण काही लोकांना त्यातही प्रॉब्लेम आहे. माझ्या मते, कंगना तुमच्यासारखी क्लासी नाही, हेच चांगले. कंगनाने कधीच डिप्रेशनचे नाटक केले नाही. तिने कधीच हिरोची अंर्तवस्त्रे मीडियासमोर टांगली नाहीत. यापेक्षा तिने मानसिक आरोग्यावरचा चित्रपट बनवला.’
तुम्हाला ठाऊक असेलच की, रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दीपिका डिप्रेशनमध्ये गेली होती. वैद्यकीय उपचारानंतर ती यातून सावरली होती. डिप्रेशन या आजारातून सावरल्यानंतर तिने ‘लिव लाफ लव्ह’ नामक संस्था उघडली. ही संस्था मानसिक आरोग्यावर काम करते.