Join us

#MeToo: कंगना राणौत व सोनम कपूरमध्ये कॅट फाईट, कंगना म्हणाली, सोनम आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 14:15 IST

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे.

ठळक मुद्देसोनमने कंगनावर दाखवला अविश्वासकंगनाने सोनमला सुनावले खडेबोल

तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. एका महिलेने दिग्दर्शक विकास बहल याच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले. या महिलेच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगना राणौत मैदानात उतरली. तिनेही विकास बहलवर खळबळजनक आरोप केलेत. या आरोपानंतर अभिनेत्री सोनम कपूरने कंगनावर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे भडकलेल्या कंगनाने सोनमला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

विकास बहल आपल्याला घट्ट पकडायचा आणि खूप जवळ यायचा, असा आरोप तिने केला आहे. या आरोपावरून सोनम कपूरने कंगणावर टीका केली आहे. कंगणाच्या बोलण्यावर विश्‍वास दाखवता येऊ शकणार नाही, असे सोनम म्हणाली. पण यामुळे सोनम आणि कंगणा यांच्यातच वाद सुरू झाला आहे. सोनमने आपल्याबाबत असे मत व्यक्‍त करायला नको होते असे म्हणून कंगणाने सोनमची खरडपट्टी काढली आहे.मला पारखणारी सोनम आहे तरी कोण. कोणत्या महिलेवर विश्‍वास करायचा आणि कोणावर विश्‍वास नाही, याचा निर्णय देण्याचे काही लायसेन्स सोनमकडे आहे का? माझ्या आरोपांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तिला कोणी दिला. मी देशाला अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रतिनिधीत्व केले आहे. माझी ओळख माझ्या वडिलांमुळे निर्माण झालेली नाही. माझ्या स्वतःच्या मेहनतीने मी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, एवढे कंगणाने सोनमला ऐकवले आहे. एवढेच नव्हे तर सोनम ही काही चांगली अभिनेत्री नाही आणि चांगली वक्‍ताही नाही, असे म्हणण्यापर्यंत कंगणाची मजल गेली आहे. अजून तरी कंगणाने केलेल्या आगपाखडीला सोनमकडून प्रत्युत्तर दिले गेलेले नाही.

टॅग्स :मीटूसोनम कपूरकंगना राणौतविकास बहल